मुंबई, 08 एप्रिल: जगातील सर्वात हुशार व्यक्ती कोण आहे असे विचारले तर बहुतेक लोक अल्बर्ट आइनस्टाइनचे नाव घेतील. पण तुम्हाला माहित आहे का की जगातील सर्वात जीनियस व्यक्ती आईनस्टाईन नसून दुसरी कोणीतरी आहे. एवढेच नाही तर त्याचा IQ आइन्स्टाईन पेक्षा जवळपास दुप्पट होता. आम्ही बोलत आहोत विल्यम जेम्स सिडिस यांच्याबद्दल, ज्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती मानले जाते. पण नक्की हे आहेत तरी कोण? चला तर जाणून घेऊया. MPSC Recruitment: सरकारी अधिकारी होण्याची सर्वात मोठी संधी; MPSC तर्फे मोठ्या पदभरतीची घोषणा कोणत्याही व्यक्तीची बुद्धिमत्ता जाणून घेण्यासाठी त्याचा बुद्ध्यांक (IQ) मोजला जातो. जरी ही पूर्ण पुरावा पद्धत नाही, परंतु सध्या ती बुद्धिमत्तेचे मोजमाप मानली जाते. सामान्य माणसाचा IQ हा 100 च्या आसपास मानला जातो. अल्बर्ट आइन्स्टाईनचा IQ 160 असल्याचे म्हटले जाते. पण विल्यम जेम्स सिडिसचा बुद्ध्यांक 250 ते 300 असा अंदाज आहे. IAS ते MBBS तब्बल 20 पदव्या आणि 42 विद्यापीठांमध्ये प्रवेश; भारतातील सर्वात शिक्षित व्यक्तीबद्दल ऐकलंय का? विल्यम जेम्स सिडिस यांचा जन्म 1898 मध्ये अमेरिकेत झाला होता. तो लहानपणापासूनच इतका हुशार होते की, वयाच्या 18 महिन्यांपासून त्यांना न्यूयॉर्क टाइम्ससारखी वर्तमानपत्रे वाचता आली. एवढेच नाही तर वयाच्या 6 व्या वर्षी ते इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन अशा अनेक भाषांमध्ये बोलायचे. ग्रॅज्युएट आहात ना? मग तब्बल 1,00,000 रुपये महिन्याच्या गव्हर्नमेंट जॉबची संधी सोडू नका; इथे होतेय भरती विल्यम जेम्स सिडिस यांना वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला. मात्र, विद्यापीठाने त्यांना वयाची 11 वर्षे पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी दिली. वयाच्या 16 व्या वर्षीच त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. मात्र एक अलौकिक बुद्धिमत्ता असल्याने, त्याला सामान्य लोकांमध्ये फारसे सोयीचे वाटले नाही आणि त्याने आपले जीवन एकांतात घालवले. मेंदूतील रक्तस्रावामुळे वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.