मुंबई, 02 डिसेंबर: आयआयटी मद्राससह देशातील आयआयटीच्या इतर कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंटची मोहिम सुरू झाली आहे. यातील मद्रासमध्ये पहिल्या दिवशी 25 विद्यार्थ्यांना कोट्यवधींच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे. तर गुवाहाटीतील 5 विद्यार्थ्यांनाही एक कोटींहून जास्त रुपयांचे पॅकेज मिळाले. पहिल्या दिवशी एकूण 445 विद्यार्थ्यांना नोकरीची ऑफर मिळाली. जागतिक मंदी असतानाही आयआयटीच्या विद्यार्थ्यांना या प्लेसमेंटमधून 1 कोटी रुपयांहून अधिक पॅकेज ऑफर केले जात आहे.
विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून मोठ्या पगाराची ऑफर दिली गेली आहे. जेन स्ट्रीट कॅपिटल या कंपनीने एका विद्यार्थ्याला 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त पॅकेज ऑफर केली आहे. इतकंच नाही तर आय़आयटी कानपूरशिवाय दिल्ली आणि बॉम्बे कॅम्पसमधील दोन विद्यार्थ्यांनाही 4 कोटी रुपयांहून अधिक पगाराचे पॅकेज देण्यात आले आहे.
हेही वाचा : काउन्सिलिंग क्षेत्रात लाखो रुपये पगारासह आहेत मोठ्या संधी; असं करा करिअर
आयआयटी गुवाहाटीतील विद्यार्थ्यांना ओरॅकलकडून 11 विद्यार्थ्याना नोकरीची ऑफिर दिली गेली आहे. यात एका विद्यार्थअयाला 2.4 कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे तर एकाला 1.1 कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर दिली गेली आहे. रुर्कीतील एका विद्यार्थ्यालाही 1.06 कोटींच्या पॅकेजची ऑफर मिळाली आहे.
2021-22 मध्ये 407 जणांची प्लेसमेंट झाली होती. पहिल्या दिवशी 4 कंपन्यांकडून 15 आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाल्या. याबाबत आयआयटी मद्रासकडून वेगवेगळ्या विभागातील एकूण 1722 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. पहिल्या टप्प्यात प्लेसमेंटसाठी एकूण 331 रजिस्टर्ड कंपन्या आहेत. त्यांच्याकडून 722 जणांची भरती केली जाणार आहे.
हेही वाचा : महिन्याचा तब्बल 1,32,000 रुपये पगार हवाय ना? मग परीक्षा देऊच नका; इथे होतेय थेट भरती
मायक्रोसॉफ्ट, ग्रेविटॉन, फ्लिपकार्ट, टेक्सास, इन्स्ट्रुमेंट्स, बजाज ऑटो, बॅन अँड कंपनी, गोल्डमॅन सॅक्स, क्वालकॉम, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी, पी अँड जी, ऑप्टिवर, मॉर्गन स्टेनली आणि मॅकिन्से यांचा समावेश आहे. सार्वजनिक ङेत्रातील कंपन्या ज्या पहिल्या टप्प्यात भरती करत आहेत त्यामध्ये ओएनजीसी आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट आणि टेलीमॅटिक्स यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.