मुंबई, 02 डिसेंबर: आजकाल शिक्षण, नोकरी पैसे, प्रॉपर्टी याबाबत काहीई समस्या असल्यास किंवा संभ्रम असल्यास लोक त्या संबंधित क्षेत्रातील काउन्सिलरकडे जातात.कोणत्याही क्षेत्रातील समस्येवर योग्य ते समाधान देण्याचं काम काउन्सिलर करतात. तसंच यामध्ये काही सल्लाही देण्याचं काम काउन्सिलर करतात. आजकालच्या काळात करिअर काउन्सिलर किंवा एज्युकेशन काऊन्सिलर्सची मागणी प्रचंड मागणी प्रचंड वाढली आहे. यात करिअर आणि पैसे कमावण्याच्याही अनेक संधी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काऊन्सिलिंगमध्ये करिअर कसं करणार आणि त्यासाठी कोणते कोर्सेस महत्त्वाचे आहेत? याबाबत माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
काउन्सिलर होण्यासाठी काही महत्त्वाचे कोर्सेस
सर्टिफिकेट इन काउन्सिलिंग
डिप्लोमा इन एज्युकेशन काउन्सिलिंग
बीए/ बीएससी इन साइकोलॉजी/ एप्लाइड साइकोलॉजी
एमए इन काउन्सिलिंग साइकोलॉजी
एमएड इन गायडन्स साइकोलॉजी
पीजी डिप्लोमा इन साइकोलॉजिकल काउन्सिलिंग
FCI Recruitment: मॅनेजर पदासाठी अर्ज केलाय? मग तुमचं Admit Card जारी; असं करा डाउनलोड
कांऊन्सिलर होण्यासाठी ही पात्रता आवश्यक
तुम्हाला काउन्सिलर व्हायचे असेल तर तुमचे इतरांचे ऐकण्याचे कौशल्य चांगले असले पाहिजे. लोकांचे म्हणणे कसे ऐकायचे आणि त्यांचा दृष्टिकोन कसा समजून घ्यायचा हे तुम्हाला माहित असले पाहिजे. काउन्सिलरसाठी हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. तसेच काउन्सिलरने प्रत्येक परिस्थितीत संयम राखला पाहिजे. कितीही विषम परिस्थिती असली तरी काउन्सिलरकडे परिस्थिती हाताळण्याची क्षमता असली पाहिजे. काउन्सिलर होण्यासाठी तुमच्याकडे दुसऱ्यांच्या समस्या समजून घेण्याची इच्छा असली पाहिजे. तरच तुम्ही एक चांगले काउन्सिलर होऊ शकाल.
या विद्यापीठांमध्ये घेऊ शकाल शिक्षण
दिल्ली विद्यापीठ, दिल्ली
जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली
राष्ट्रीय सार्वजनिक सहकार आणि बाल विकास संस्था, नवी दिल्ली
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली
महर्षि दयानंद विद्यापीठ, रोहतक
बनारस हिंदू विद्यापीठ, बनारस
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई
पंजाब विद्यापीठ, चंदीगड
अलीगढ विद्यापीठ, अलीगढ
ख्रिस्त विद्यापीठ, बंगलोर
Maharashtra Talathi Bharti: तब्बल 4122 जागांसाठी भरती; पण तुम्ही किती एलिजिबल? इथे मिळेल A-Z माहिती
किती असतो काउन्सिलरचा पगार
काउन्सिलर म्हणून नोकरी करताना तुम्हाला सुरुवातीला 15,000 ते 40,000 रुपये प्रतिमहिना पर्यंत पगार मिळू शकतो. तसंच काउन्सिलर म्हणून तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरु करू शकता. लोकांना सल्ला देऊन आणि मदत करू पैसे कमवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Job, Jobs Exams