जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही Facebook मध्ये नोकरी करायची आहे? मग स्वतः मार्क झुकरबर्गने सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवाच

तुम्हालाही Facebook मध्ये नोकरी करायची आहे? मग स्वतः मार्क झुकरबर्गने सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवाच

तुम्हालाही Facebook मध्ये नोकरी करायची आहे? मग स्वतः मार्क झुकरबर्गने सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवाच

मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच आपल्या कंपनीत नोकरी मिळवण्याविषयी महत्त्वाची माहिती दिली.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 23 मार्च:   दिवसातला कितीतरी वेळ आपण फेसबुकवर असतो. फेसबुक म्हणजे एक ऑनलाईन कट्टाच झालेला आहे. मेटा (Meta), गूगल (Google) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सारख्या मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणे अनेकांचे स्वप्न असते. अनेक विद्यार्थी त्यासाठी प्रयत्नशील असतात. फेसबुक (How to get job in Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इन्स्टाग्राम (Instagram) सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मची पालक कंपनी असलेल्या मेटा (Meta) चे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी नुकतीच आपल्या कंपनीत नोकरी मिळवण्याविषयी महत्त्वाची माहिती दिली. झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार या कोणत्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया. जर तुम्हाला मेटासारख्या एखाद्या महत्त्वाच्या आणि मोठ्या कंपनीत नोकरी करायची असेल तर झुकरबर्गने सांगितलेल्या काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. मार्क झुकरबर्ग यांनी काही दिवसांपूर्वी एमआयटी (MIT) चे कॉम्प्युटर सायंटिस्ट लेक्स फ्रीडमन (Lex Fridman) यांच्यासह एका पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी आपल्या कंपनीत नोकरी देताना आपण उमेदवारांच्या कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष देतो, त्यांच्या कोणत्या वैशिष्ट्यांकडे पाहतो, हे सांगितलं. उमेदवारांनो, आता तुम्हाला कोणीही नाकारू शकणार नाही Job; असा बनवा प्रभावी Resume फेसबुकमध्ये नोकरी देताना नेमकं काय पाहून लोकांना नोकरी दिली जाते, हा प्रश्न पॉडकास्टमध्ये झुकरबर्ग यांना विचारला गेला तेव्हा ते म्हणाले, ‘सगळ्यात आधी आम्ही याचा विचार करतो, की समोर बसलेल्या व्यक्तीशी मी स्वत:ला कितपत रिलेट करू शकतो? या व्यक्तीसोबत माझं कितपत जमेल याचा अंदाज येण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये कामाची समज, कामाबद्दलची निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी आहेत की नाहीत, याची चाचपणी करतो. जेणेकरून या व्यक्तीसोबत काम करणं, सोपं जाईल. समोर बसलेली व्यक्ती आणि मी एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतो का, ज्यामुळे पुढे जाऊन ते एकमेकांसोबत उत्तम सांघिक भावनेने काम करू शकू.’ आपल्या या दृष्टिकोनामागचं कारण सांगताना मार्क झुकरबर्ग म्हणाले, ‘हे माझ्यासाठी फार गरजेचं आणि फार महत्त्वाचं आहे. कारण जे माझ्या तत्त्वांशी सहमत असतील, ज्यांना ती महत्त्वाची वाटत असतील, केवळ अशाच व्यक्ती कंपनीच्या तत्त्वांना, धारणांना न्याय देऊ शकतात आणि कंपनी पुढे नेण्यात खऱ्या अर्थाने हातभार लावू शकतात.’ GATE परीक्षेनंतर काय करावं माहिती नाहीये? चिंता नको; हे आहेत करिअर ऑप्शन्स

    या पॉडकास्टमध्ये मार्क यांनी मांडलेली मतं फेसबुक, इन्स्टाग्राममध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी नक्कीच उपयुक्त ठरतील. तसंच इतर उमेदवार जे नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठीही मार्क यांचा दृष्टिकोन नक्कीच मार्गदर्शक ठरेल. तुमच्यामध्ये आवश्यक कौशल्यांबरोबरच जर हे सगळे गुण असतील तर सज्ज व्हा फेसबुकमध्ये नोकरी मिळवण्यासाठी!

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात