जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IMP: तुम्हीही जॉब स्विच करताय? मग कंपनीकडून ‘हे’ प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका; अन्यथा...

IMP: तुम्हीही जॉब स्विच करताय? मग कंपनीकडून ‘हे’ प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका; अन्यथा...

‘हे’ प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका

‘हे’ प्रमाणपत्र घ्यायला विसरू नका

अनेकदा नोटीस पीरियड पूर्ण करण्याऐवजी पैसे भरणं पसंत करतात; पण तुम्हाला माहिती आहे का, नोकरी बदलताना काही कागदपत्रं आठवणीनं घेणं गरजेचं आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17  डिसेंबर:  चांगल्या पगाराची ऑफर येताच नोकरी बदलण्याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलं आहे. बरेच कर्मचारी तर नोकरी सोडताना संबंधित कंपनी व कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार नोटीस पीरियडसुद्धा पूर्ण करत नाहीत. अनेकदा नोटीस पीरियड पूर्ण करण्याऐवजी पैसे भरणं पसंत करतात; पण तुम्हाला माहिती आहे का, नोकरी बदलताना काही कागदपत्रं आठवणीनं घेणं गरजेचं आहे. ‘टीव्ही 9 हिंदी’ने याबाबतचं वृत्त दिलंय. दर वर्षी अनेक कर्मचारी चांगल्या पगारासाठी नोकरी बदलतात. असं करीत असताना, जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजना आणि कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेचा (EPS) भाग आहेत, त्यांनी जुन्या ईपीएफ अकाउंटमधून नवीन कंपनीत पैसे ट्रान्स्फर करण्याचीदेखील काळजी घेतली पाहिजे. बर्‍याच कर्मचार्‍यांना हे माहिती नसतं, की नोकरी बदलताना त्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ईपीएस प्रमाणपत्रसुद्धा घेतलं पाहिजे. काय सांगता! MPSC पास न करताही तरुणांना राज्य सरकार देणार जॉब्स? नक्की कोणाला होणार फायदा?

घरबसल्या असं मिळवा ईपीएस प्रमाणपत्र ईपीएस प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी असून ती ऑनलाइन करता येते. ‘सदस्य सेवा पोर्टल’ला भेट देऊन ईपीएफ सदस्य ईपीएस योजनेच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतो. ही नेमकी प्रक्रिया कशी आहे, ते जाणून घेऊ या.

स्टेप 1 : सर्वप्रथम, तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN ) आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. स्टेप 2 : यानंतर, ‘मेनू’ टॅबमधल्या ‘ऑनलाइन सेवां’वर क्लिक करा. तिथे ‘क्लेम (फॉर्म – 31, 19 आणि 10C)’ ऑप्शन निवडा . स्टेप 3 : त्यानंतर, ईपीएफओ रेकॉर्डमध्ये नोंदणीकृत बँक अकाउंट क्रमांक टाका आणि ‘व्हेरिफाय करा’ वर क्लिक करा. आता, तुम्हाला सर्टिफिकेट किंवा अंडरटेकिंग ऑप्शनवर क्लिक करावं लागेल आणि ‘YES’ वर टॅप करावं लागेल. सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती स्टेप 4 : “I want to apply for” सेक्शन निवडा आणि “only pension withdrawal (Form 10C)” वर क्लिक करा. स्टेप 5 : ईपीएफओ रेकॉर्डनुसार तुमचा पूर्ण घराचा पत्ता टाका, ‘डिस्क्लेमरवर’ क्लिक करा आणि ‘आधार ओटीपी मिळवा’वर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल. स्टेप 6 : ओटीपी टाका, आणि ‘Validate OTP’वर क्लिक करा. शेवटी ‘सबमिट फॉर्म’ वर क्लिक करा. ईपीएस प्रमाणपत्र आहे आवश्यक ईपीएफ कायद्यानुसार, नोकरी सोडताना किंवा ईपीएफ योजनेतून बाहेर पडताना कर्मचाऱ्याने ईपीएस प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे; मात्र अनेक जण त्याचं काटेकोरपणे पालन करत नाहीत. कर्मचार्‍यांनी ईपीएस योजनेचं प्रमाणपत्र यासाठी घ्यावं, जेणेकरून त्यांना कोणत्या सेवा कालावधीसाठी पेन्शन मिळेल, याची नोंद ठेवणं सोयीस्कर होईल. काय सांगता! तब्ब्ल 75,000 रुपये सॅलरीची नोकरी अन् एकही परीक्षा नाही; ऑर्डनन्स फॅक्टरीत थेट जॉब उदाहरणार्थ, समजा एखाद्या कर्मचाऱ्यानं नोकरी बदलली आणि त्याची नवीन कंपनी ईपीएफ योजनेत समाविष्ट नाही, अशा परिस्थितीत, जुन्या ईपीएफ अकाउंटशी संबंधित पेन्शन योजना प्रमाणपत्र असल्यास मदत होईल. हे तुमच्या पेन्शनच्या दाव्यासाठी पुरावा म्हणून काम करेल. नोकरी बदलताना जुन्या कंपनीतून काही कागदपत्रं आठवणीने घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये ईपीएस प्रमाणपत्र हे एक महत्त्वाचं कागदपत्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात