मुंबई, 17 डिसेंबर: महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC ची परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी असतात. आपल्यालाही सरकारी नोकरी मिळावी यासाठी जीव लावून मेहनत करत असतात. अगदी आपल्या आयुष्याची काही वर्ष MPSC पास करून जॉब मिळवण्यासाठी वेचतात. मात्र तरीही खूप लोकांना MPSC पास करून अधिकार होण्याची संधी मिळत असते. याचं प्रमुख कारण म्हणजे MPSC परीक्षेची कठीणता. राज्यात अधिकारी पदांवर नोकरी मिळवणं म्हणेज सोपं नाही. म्हणूनच अनेकांचं हे स्वप्नं अधुरं राहतं. पण आता जे उमेदवार MPSC पास करू शकणार नाहीत अशांनाही नोकरी देण्याबद्दल विचार राज्यसरकार करत आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पण हे जॉब नक्की असतील तरी कोणते? याबद्दल आज आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत. राज्यातील जे तरुण MPSC परिक्षेची तयारी करून पुर्व परिक्षा पास होतात पण मुख्य परिक्षा पास होऊ शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी जॉबची सुविधा राज्य सरकार करण्याच्या विचारात आहे. पण जॉब सरकारी नसून हे जॉब्स कंत्राटी स्वरूपाचे असणार आहेत अशीही माहिती राज्य सरकार कडून देण्यात आली आहे. अर्थात या सर्व गोष्टींवर राज्य सरकारकडून फक्त विचार केला जातो आहे. सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी मध्य रेल्वेची घोषणा; राज्यात तब्बल 2422 जागांसाठी मेगाभरती तरुणांना राज्य सरकारकडून जी हजारो पदे कंत्राटी पद्धतीवर भरली जातात त्यामधे प्राधान्य देण्याचा विचार. यामुळे सरकारचाही पैसा वाचेल आणि तरुणांना योग्य मोबदला मिळेल. कारण कंत्राट घेणारा कर्मचाऱ्यांना व्यवस्थित पगार देत नाही त्यामुळे अशा तरुणांना चांगला पगारही मिळेल असा विचार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवला आहे. अर्थात या संबंधीचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री घेणार आहेत अशीही माहिती देण्यात आली आहे. पण हे कंत्राटी जॉब करण्या आधी उमेदवारांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. कंत्राटी जॉब करण्याचे फायदे कंत्राटी नोकरी तुम्हाला लवचिक वेळापत्रकात काम करण्याची क्षमता देऊ शकते तुम्ही कमी कालावधीत विविध कौशल्ये मिळवू शकता लाभांची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही जास्त पगार मिळवता. कंत्राटी कामामुळे तुम्हाला अनेक उद्योगांमध्ये काम करण्याची संधी मिळते तुम्हाला तुमच्या करिअरच्या आवडीशी जुळणारी नोकरी मिळेपर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये काम करू शकता. तुम्हाला लगेच जब मिळण्याची शक्यता असते. JOB ALERT: डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट्ससाठी जागा तब्बल 661; अर्जाला उरलेत अवघे काही तास; इथे करा अप्लाय कंत्राटी जॉब करण्याचे तोटे भूमिकेनुसार पदावर नोकरीच्या सुरक्षिततेचा अभाव असू शकतो करार संपल्यानंतर तुम्हाला नवीन नोकरी शोधावी लागेल कायमस्वरूपी भूमिकेच्या तुलनेत तुम्हाला कमी लाभ मिळण्याची शक्यता आहे कायमस्वरूपी नोकरीच्या तुलनेत आरोग्य लाभ तितके चांगले असू शकत नाहीत. कायम कर्मचारी म्हणून तुम्हाला आजारी आणि सुट्टीचे वेतन हक्क मिळणार नाहीत. काय सांगता! तब्ब्ल 75,000 रुपये सॅलरीची नोकरी अन् एकही परीक्षा नाही; ऑर्डनन्स फॅक्टरीत थेट जॉब अर्थात वरील सर्व फायदे आणि तोटे हे सर्व कंपन्यांसाठी आणि MPSC साठी लागू होतीलच असं नाही. कंपनीच्या पॉलिसीनुसार हे सर्व फायदे आणि तोटे बदलत असतील. त्यामुळे पुढे राज्य सरकारनं असं काही करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तुम्ही पात्र असाल तर नक्कीच वरील सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्ही नोकरी घेणं आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.