मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ICSE, ISC Result 2021: 10वी, 12वीचा निकाल जाहीर; निकालाची टक्केवारी बघून वाटेल आश्चर्य

ICSE, ISC Result 2021: 10वी, 12वीचा निकाल जाहीर; निकालाची टक्केवारी बघून वाटेल आश्चर्य

 यावेळी एकूण निकालाची आकडेवारी थक्क करणारी आहे.

यावेळी एकूण निकालाची आकडेवारी थक्क करणारी आहे.

यावेळी एकूण निकालाची आकडेवारी थक्क करणारी आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 24 जुलै: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बोर्डानं ISCE आणि ISC च्या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. मात्र विशेष मूल्यांकन पद्धतीनं आज म्हणजेच 24 जुलैला ISCE आणि ISC बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल (ICSE, ISC Result 2021) जाहीर करण्यात आला आहे. मात्र यावेळी एकूण निकालाची आकडेवारी थक्क करणारी आहे.

ISCE आणि ISC बोर्डाचा निकाल यावेळी विशेष मूल्यांकन (Special Assessment) पद्धतीनं लावण्यात आला आहे. त्यामुळे यंदा ISCE बोर्डाचा (ISCE board result 2021) निकाल हा 99.98 टक्के लागला आहे. तर ISC बोर्डाचा (ISC board result) निकाल 99.76 टक्के इतका लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल DigiLocker वरही बघता येणार आहे.

हे वाचा - Engineers Jobs: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये मोठी पदभरती; करा अप्लाय

SMS द्वारे बघता येऊ शकतो निकाल

ISCE आणि ISC बोर्डाचा निकाल आता SMS द्वारे बघता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आपला युनिक आयडी 09248082883  या नंबरवर पाठवावा लागणार आहे. ICSE/ISC (यूनिक आईडी) असा या SMS चा फॉरमॅट असणार आहे. यावर SMS पाठवल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना निकाल कळू शकणार आहे.

असं करा फेरमूल्याकंन

यावेळी परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाऊ शकत नाही. परंतु मूल्यमापनाच्या प्रक्रियेवर असमाधानी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आक्षेपांचा विचार करण्याची सोय कौन्सिलनं केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत अर्ज द्यावा लागेल. ज्यामध्ये आक्षेप स्पष्टपणे सांगावा लागेल. ज्यानंतर शाळा त्यावर विचार करण्यास सक्षम असेल आणि विद्यार्थ्याच्या कारणावर समाधानी झाल्यावरच ते CISCE ला पाठवेल. त्यामुळे परिषदेनं शाळांना १ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे.

First published:

Tags: 10th class, Exam result