हैदराबाद, 24 जुलै: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (BEL Recruitment 2021) मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधसूचना जारी करण्यात आली आहे. इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेल्या आणि अनुभवी असलेल्या इंजिनिअर्ससाठी (Engineering Jobs) ही सुवर्णसंधी असणार आहे. तब्बल 49 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Electronics) - 36
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Mechanical) - 08
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Computer Science) - 04
प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) - 01
एकूण जागा - 49
हे वाचा - Sarkari Naukri: केंद्रीय विद्यालयांमध्ये पदभरती सुरू; लवकर करा अर्ज
शैक्षणिक पात्रता
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Electronics) - Electronics मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Mechanical) - Mechanical मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट इंजिनिअर-I (Computer Science) - Computer Science मध्ये BE/B.Tech/B.Sc Engg आणि 02 वर्षांचा अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर-I (HR) - MBA / MSW / MHRM आणि 02 वर्षांचा अनुभव
शुल्क
या भरतीमध्ये अप्लाय करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये शुल्क असणार आहे तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी निशुल्क असणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 04 ऑगस्ट 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs