ICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही

ICSE Board Exams 2020: 10वी-12वीच्या परीक्षा रद्द, पुन्हा परीक्षेचा पर्याय नाही

परीक्षा रद्द झाल्यानं लवकरच निकाल मिळण्याची विद्यार्थ्यांची आशा वाढली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जून : CBSC बोर्डानं दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर आता ICSE बोर्डानंही या निर्णयाला संमती दर्शवली आहे. सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं आहे. परीक्षा रद्द झाल्यानं महाराष्ट्रासह देशभरातील ICSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्रातही दहावी-बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. त्यानंतर ICSE बोर्ड आणि CBSC बोर्डाच्या उर्वरित परीक्षांबाबत निर्णय़ येणं बाकी होतं. सुप्रीम कोर्टात गुरुवारी झालेल्या सुनावणीनंतर परीक्षा रद्द करण्यात आल्या असून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत कोणताही विचार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे.

हे वाचा- CBSC Board Exam 2020: मोठी बातमी! दहावी-बारावीची परीक्षा रद्द

ICSE बोर्डाच्या दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. CBSC बोर्डानं घेतलेल्या निर्णयाचं ICSE बोर्ड अनुसरण (Follow) करेल असंही बोर्डाकडून कोर्टात सांगण्यात आलं होतं.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 25, 2020, 2:59 PM IST

ताज्या बातम्या