नवी दिल्ली, 25 जून: सीबीएससी बोर्डाच्या दहावी- बारावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय आला आहे. 1 ते 15 जुलै दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सीबीएससी बोर्डानं आपली बाजू कोर्टात मांडल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. CBSC सोबतच ICSE बोर्डानंही आपल्या दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द केल्या आहेत.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. सीबीएससी (CBSC) आणि ICSE बोर्डाच्या परीक्षा कधी होणार होणार की रद्द केल्या जाणार याबाबत अनेक दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम होता. सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर या परीक्षा रद्द करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. देशभरात CBSC आणि ICSE बोर्डाच्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सीबीएसई बोर्डाने (सीबीएसई बोर्ड) दहावी व बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांच्या हातात निकाल मिळण्याची आशाही वाढली आहे. वास्तविक, सीबीएसई बोर्डाने याआधी लॉकडाऊन होण्याआधी मूल्यांकन करण्यास सुरुवात केली होतीआता उर्वरित परीक्षा रद्द झाल्यानं निकाल लवकर मिळेल अशी अशा विद्यार्थ्यांना आहे.
संपादन- क्रांती कानेटकर
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.