मुंबई, 17 फेब्रुवारी: महाराष्ट्र पोलीस भरती सुरु आहे यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला आहे. पोलीस भरतीत सुरुवातीला मैदानी परीक्षा आणि त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतील मैदानीचा पहिला टप्पा संपला आहे. मात्र लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांना अजुनही संभ्रम आहे. लेखी परीक्षांच्या तारखा अजूनही जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही लेखी परीक्षा कधी होणार याबाबत उमेदवारांकडून विचारणा करण्यात येत आहे. मात्र आता पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात 18 हजार 331 पोलिस शिपाई व चालक पदांची भरती प्रक्रियेतीलमैदानी प्रक्रिया झालीय. मात्र तृतीपंथींच्या मैदानी चाचणीचे निकष अजूनही निश्चित झाले नाहीत. त्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. 72 तृतीयपंथींची मैदानी चाचणी रखडल्याने 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. जागा तब्बल 11,000 आणि पात्रता फक्त 10वी पास; सरकारी नोकरीसाठी आजची शेवटची तारीख; करा अप्लाय मैदानी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका पदासाठी 10 उमेदवारांची मेरिटनुसार लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे. त्यानुसार 1 लाख 83 हजार 310 उमेदवार लेखीसाठी पात्र ठरतील. मात्र तृतीयपंथींची मैदानी परीक्षा झाल्याशिवाय पोलीस भरतीच्या उमेदवारांची लेखी परीक्षा होणार नाहीये. निकष ठरल्यानंतर मार्चमध्ये त्यांची मैदानी चाचणी पार पडेल. दुसरीकडे दहावी-बारावीसह बहुतेक विद्यापीठांच्या परीक्षांमुळे केंद्रे उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिल महिन्यात होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशी असेल लेखी परीक्षा 100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लाखो रुपये पगाराचा गोल्डन चान्स; TCS करणार मोठी पदभरती
विभाग नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | एकूण वेळ |
---|---|---|---|
गणित | 25 प्रश्न | 25 गुण | 90 मिनिट |
बौद्धिक चाचणी | 25 प्रश्न | 25 गुण | |
मराठी व्याकरण | 25 प्रश्न | 25 गुण | |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 25 प्रश्न | 25 गुण | |
एकूण | 100 प्रश्न | 100 गुण |
परीक्षेदरम्यान प्रकृती चांगली ठेवायची आहे ना? मग आहारही IMP; असा ठेवा Diet Plan गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेशनुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत अशी माहिती अधिसूचनेनंत देण्यात आली आहे.