Home /News /career /

"मोदीजी NEET पुढे ढकला अन्यथा आयुष्यात भाजपला मत देणार नाही” सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल;आज आंदोलन

"मोदीजी NEET पुढे ढकला अन्यथा आयुष्यात भाजपला मत देणार नाही” सोशल मीडियावर पोस्ट्स व्हायरल;आज आंदोलन

NEET UG

NEET UG

NEET ही परीक्षा पुढे ढकलावी, नाहीतर आयष्यात भाजपला एकही मत देणार नाही अशी पोस्ट काही नेट यूजर्स करत आहेत.

    मुंबई, 01 जुलै: नॅशनल एलिजिबिलिटी (National Eligibility) आणि एंट्रन्स परीक्षा 2022 (Entrance Exam 2022) शी संबंधित हॅशटॅग सोशल मीडियावर (Social Media Hashtags) ट्रेंड करत आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA ने JEE Mains 2022 पुढे ढकलल्यापासून NEET परीक्षा (NEET Exam 2022) देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे. ट्विटरवरकाही हॅशटॅग्स ट्रेंड करत आहे. NEET परीक्षेसाठी (Why NEET Exam tags is trending on Twitter) विद्यार्थ्यांना फार कमी वेळ मिळणार आहे म्हणून NEET 2022 (NEET Exam 2022 date) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सुरु आहे. इतकंच नाही तर ही परीक्षा पुढे ढकलावी, नाहीतर आयष्यात भाजपला एकही मत देणार नाही अशी पोस्ट काही नेट यूजर्स करत आहेत. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा (NEET) 2022 काही आठवड्यांत होणार आहे. भविष्यातील डॉक्टर आणि एनईईटीचे उमेदवार चिंताग्रस्त अवस्थेत आहेत कारण त्यांच्याकडे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी थोडा वेळ शिल्लक आहे. अभ्यास होणार नाही म्हणून ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सुरु आहे IBPS Clerk 2022: IBPS परीक्षा पास करा तुमची बँकेत नोकरी फिक्स; देशातील 'या' बँकांमध्ये मिळतात जॉब्स उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, CUET आणि JEE मेन एकाच वेळी पडत आहेत, ज्यामुळे परीक्षेची तयारी कठीण होते. पुढे, ज्यांना NEET 2021 च्या समुपदेशनात यश मिळू शकले नाही त्यांचे म्हणणे आहे की ते उशिरा संपले त्यामुळे त्यांना वर्षातून एकदा होणाऱ्या परीक्षेची तयारी करण्यासाठी फक्त काही महिने शिल्लक राहिले म्हणून परीक्षा पोस्टपोन करा अशी मागणी सुरु आहे. हे हॅशटॅग्स होताहेत ट्रेंड विद्यार्थ्यांनी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन आपल्या मागण्या मांडल्या आहेत. NEET 2022 च्या इच्छुकांनी आता #RemoveDharmendraPradhan या हॅशटॅगसह ट्विटरवर प्रवेश केला आहे. तसंच .#MODIJIextendNEETUG , #postponeneetug2022 हे हॅशटॅग्सही ट्रेंड होतात आहेत. आज संध्याकाळी निघणार कँडल मार्च आज डॉक्टर्स डे आहे. एकजूट होऊन सरकारला पुढे ढकलण्याची विनंती ते ऐकू शकतात...#MODIJIextendNEETUG #postponeneetug2022," इंडिया गेटवर आज संध्याकाळी 7:30 वाजता होणाऱ्या मेणबत्ती मार्च होणार आहे अशी माहिती ट्विटरवर देण्यात आली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Entrance Exams, Exam Fever 2022, Medical exams

    पुढील बातम्या