Home /News /career /

JEE Exam Tips: परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक; अशा पद्धतीनं करा अभ्यास; Crack होईल परीक्षा

JEE Exam Tips: परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक; अशा पद्धतीनं करा अभ्यास; Crack होईल परीक्षा

JEE mains 2022 परीक्षा

JEE mains 2022 परीक्षा

तुम्हीही JEE mains 2022 परीक्षा (JEE Mains Exam 2022 study tips) देणार असल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया.

    मुंबई, 13 एप्रिल: दरवर्षी लाखो विद्यार्थी JEE Mains परीक्षा (JEE Mains Exam 2022) देतात. बारावीनंतर कोणत्याही टेक्निकल आणि इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश (How to get admission in Engineering) मिळवण्यासाठी या परीक्षेचे मार्क्स महत्त्वाचे असतात. म्हणूनच अनेक विद्यार्थी यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. आपल्यालाच चांगलं कॉलेज मिळावं यासाठी प्रत्येक विषयाचा जीवतोड अभ्यास करत असतात. यंदा ही परीक्षा लवकरच होणार आहे. यासाठी विद्यार्थी मेहनत करत आहेत. मात्र JEE परीक्षेला (JEE mains preparation tips) अवघे काही दिवस शिल्लक असताना विद्यार्थ्यांनी नक्की कसा अभ्यास (How to study for JEE mains) करावा ही आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्हीही JEE mains 2022 परीक्षा (JEE Mains Exam 2022 study tips) देणार असल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर जाणून घेऊया. विद्यार्थ्यांनी या दिवसात कोणताही नवीन विषय शिकणे टाळावे. तुम्ही आतापर्यंत जेवढा अभ्यास केला आहे तेवढी उजळणी करण्याचा प्रयत्न करा, कारण तुम्ही जितका सराव कराल तितकी तुमची विषय आणि विषयांवर पकड मजबूत होईल. तुम्हीही रेल्वेमध्ये जॉब करण्यासाठी परीक्षांची तयारी करताय? मग 'या' टिप्स नक्की येतील कामी; वाचाच NCERT वर अधिक लक्ष केंद्रित करा, कारण गेल्या काही वर्षांच्या पेपरमध्ये NCERT मधूनच सर्वाधिक प्रश्न विचारले गेले आहेत. विशेषत: रसायनशास्त्रात तुम्ही NCERT पाठ्यपुस्तके आणि इतर अभ्यास साहित्याची मदत घेतली तर ते उपयुक्त ठरेल. कोणताही विषय कमकुवत असल्यास मागील वर्षांचे जास्तीत जास्त पेपर सोडवून सराव करा. त्यामुळे विषयावरील पकडीबरोबरच आत्मविश्वासही वाढेल. भीती दूर होईल. परीक्षेच्या तयारीसाठी वेळ आणि वातावरणही महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत कुटुंब आणि आजूबाजूचे वातावरण अभ्यासाला पोषक असावे यासाठी प्रयत्न करा. परीक्षेच्या वेळी शक्य तितक्या मॉक टेस्ट द्या. यावेळी मॉक टेस्टच्या मदतीने विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ आणि वातावरणाशी जुळवून घेता येणार आहे. मॉक टेस्ट देताना जुन्या चुका दूर करण्याचा प्रयत्न करा, कारण जितक्या चुका काढल्या जातील तितकी कामगिरी चांगली होईल. मॉक टेस्ट नंतर विश्लेषण करा आणि पुढील परीक्षेत त्या चुका टाळा. परीक्षा पद्धतीचा अभ्यास आवश्यक आहे. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, किती विचारले जातील हे जाणून घेतल्याने तुम्हाला परीक्षेसाठी चांगली तयारी करण्यास मदत होऊ शकते. उमेदवारांनो, कॅम्पस प्लेसमेंटसाठी Online Interview देताना 'या' गोष्टी कराच उन्हाळा सुरु आहे, स्वतःला निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यामुळे ज्यूस, लिंबूपाणी आणि नारळपाणी इत्यादी द्रवपदार्थ अधिकाधिक प्या.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    पुढील बातम्या