Home /News /career /

CBSE Exam Tips: विद्यार्थ्यांनो, Science च्या पेपरचं टेन्शन घेऊ नका; अशा पद्धतीनं करा अभ्यास

CBSE Exam Tips: विद्यार्थ्यांनो, Science च्या पेपरचं टेन्शन घेऊ नका; अशा पद्धतीनं करा अभ्यास

ज्ञान हा विषय कधीच कठीण वाटणार नाही

ज्ञान हा विषय कधीच कठीण वाटणार नाही

आज आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला विज्ञान हा विषय कधीच कठीण वाटणार नाही आणि चांगले मार्क्स मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 21 एप्रिल: दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना सर्वाधिक कठीण वाटणारा विषय म्हणजे विज्ञान (Science exam preparation). अनेक विद्यार्थ्यांना हा विषय समजतच नाही अशी त्यांची तक्रार असते. तर काही विद्यार्थ्यांना फिजिक्स (Tips for Study Physics), केमेस्ट्री (Study Tips for Chemistry) आणि बायोलॉजी या विज्ञानाच्या तीन शाखांमधील फरक समजून घेण्यासही अडचण होते. मात्र विद्यार्थ्यांनो परीक्षा म्हटलं की विज्ञानाचा पेपर (How to solve Science paper for CBSE Exam 2022) लिहावा लागणारच. पण आता चिंता करू नका. बोर्डाच्या परीक्षेसाठी विज्ञानाचा अभ्यास नक्की कसा करावा? (how to study science in board exams) याबद्दल आज आम्ही तुम्हाला टिप्स देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला विज्ञान हा विषय कधीच कठीण वाटणार नाही आणि चांगले मार्क्स मिळू शकतील. चला तर मग जाणून घेऊया. CBSE Exam: विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या काळात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका; असं ठेवा स्वतःचं Diet फिजिक्स (भौतिकशास्त्र) फिज़िक्समध्ये नेहमीच महत्वपूर्ण आणि फोर्मुलांच्या आधारावर प्रश्न विचारले असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमीच अभ्यास करताना हे फॉर्मुले आणि सिद्धांत यांच्यासह उत्तर लिहिण्याच सराव केला पाहिजे. फिजिक्स या विषयात जितकं महत्व तुमच्या उत्तरला आहे तितकंच महत्त्व त्या उत्तरातील आकृतीला आहे. त्यामुळे आकृतीला मार्क्सही असतात. म्हणूनच प्रश्न कुठलाही असो त्यामध्ये आकृती काढायला आली असेल तर नक्की काढा. यासाठी अभ्यास करताना दररोज सर्व आकृत्या काढून बघा. यामुळे तुम्हाला अधिक मार्क्स मिळू शकतात. तसंच एखाद्या प्रश्नाचं उततर येत नसेल मात्र आकृती आठवत असेल तर परीक्षेच्या वेळी पेपरमध्ये आकृती नक्की काढा. यामुळे तुम्हाला निम्मे मार्क्स मिळू शकतात. न्यूमरिकल्सचा अभ्यास करताना नेहमी सोडवून बघा. फिजिक्समधील अनेक प्रश्नांमध्ये न्यूमरिकल्स विचारण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांचा सराव नक्की करा. महत्वाची गोष्ट म्हणजे मागील काही वर्षांच्या पेपरचा अभ्यास करा आणि ते सोडवून बघा. यामुळे तुम्हाला तुमच्या पेपर पॅटर्नचा अनुभव येईल आणि नेहमी विचारले जाणारे प्रश्न समजतील. काही अडचण असल्यास आपल्या शिक्षकांना जरूर विचारा. केमेस्ट्री (रसायनशास्त्र) केमेस्ट्री हा विषय सार्वधिक मार्क्स मिळवून देणारा विषय आहे. यामध्ये रासायनिक समीकरणे बॅलेन्स करण्याच्या पद्धती तुम्हाला माहिती असल्यास तुम्हाला मार्क्स मिळवणं कठीण होणार नाही. केमेस्ट्री हा विषय पूर्णतः पिरियॉडिक टेबलवर अवलंबून आहे. जर तुम्हाला याबद्दल सर्व काही माहिती असेल तरच तुम्ही केमेस्ट्रीमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता. त्यामुळे पिरियॉडिक टेबल लक्षात ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करा. विज्ञानाचा पेपर सोडवताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. अभ्यास करताना आणि काही जुने पेपर सोडवून बघताना तुम्हाला लागणाऱ्या वेळेची नोंद ठेवा. यामुळे तुम्हाला परीक्षेत वेळेत पेपर लिहिता येईल. CBSE परीक्षेला अवघा एक आठवडा शिल्लक; लगेच सुरु करा लिखाणाची प्रॅक्टिस; वाचा Tips
  बायोलॉजी (जीवशास्त्र)
  अनेकदा विद्यार्थ्यांना हा विषय सर्वाधिक कठीण वाटतो. याचं प्रमुख कारण म्हणजे या विषयात असणाऱ्या मोठमोठ्या आकृत्या, धडे आणि काही जीवांची कठीण नावं. विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी लक्षात ठेवण्यास अडचण होते. अनेकदा विद्यार्थी गोंधळून जातात. मात्र चिंता करू नका हा विषयसुद्धा चांगले मार्क्स मिळवून देऊ शकतो. बायोलॉजीचा अभ्यास करताना कधीही कुठलं उत्तर एकदा वाचून सोडून देऊ नका. उत्तर वाचल्यानंतर ते समजून घेण्यासाठी २ ते ३ वेळा वाचा. जर तुम्हाला उत्तर समजलं तर तुम्ही ते कधीच विसरणार नाही; तसंच मोठ्या आकृत्या लक्षात ठेवण्यासाठी त्या वारंवार कागदावर काढून बघा. त्यामधील नावं मेमोनॉमिक्स पद्धतीनं लक्षात ठेवा. यामुळे तुम्हाला कधीच आकृत्या काढण्यास अडचण येणार नाही. अभ्यास करताना बायोलॉजीमधील जीवांची मोठमोठी नावं लक्षात ठेवण्यासाठी ती एका कागदावर लिहून घराच्या दारांवर, भिंतीवर किंवा तुमच्या अभ्यासाच्या खोलीत लावून ठेवा. येता जाताना सतत ही नावं मोठ्यानं वाचत राहा. यामुळे तुम्हाला ही नावं पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career opportunities, CBSE 10th, CBSE 12th, Education, Science

  पुढील बातम्या