जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / CBSE Exam: विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या काळात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका; असं ठेवा स्वतःचं Diet

CBSE Exam: विद्यार्थ्यांनो परीक्षेच्या काळात प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका; असं ठेवा स्वतःचं Diet

आहारात फायबर पदार्थांचा समावेश करा - 

ज्या लोकांच्या पोटात नेहमी गॅस असतो आणि त्यांना बद्धकोष्ठतेसारखे वाटते, त्यांना त्यांच्या आहारात काही बदल करावे लागतील. फायबर युक्त गोष्टींचे अधिकाधिक सेवन करावे.

आहारात फायबर पदार्थांचा समावेश करा - ज्या लोकांच्या पोटात नेहमी गॅस असतो आणि त्यांना बद्धकोष्ठतेसारखे वाटते, त्यांना त्यांच्या आहारात काही बदल करावे लागतील. फायबर युक्त गोष्टींचे अधिकाधिक सेवन करावे.

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Exam diet Tips) देणार आहोत ज्या वापरून तुम्ही परीक्षेदरम्यान आपला आहार (Diet for Exams period) व्यवस्थित ठेऊ शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 एप्रिल: परीक्षा म्हंटलं की विद्यार्थ्यांच्या तोंडचं पाणी पळतं. परीक्षा जशी जशी जवळ येऊ लागते तशी विद्यार्थ्यांची अभ्यासाची (How to study in exams) लगबग सुरू होते. नव्या जोमानं आणि नव्या तयारीनं विद्यार्थी अभ्यास करू लागतात. मात्र या सगळ्यामध्ये विद्यार्थी आपल्या आहाराकडे (best diet during Exams), खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात. ज्यामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडण्याचं प्रमाण वाढू शकतं. तुम्हालाही असंच काहीसं होत असेल तर आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Exam diet Tips) देणार आहोत ज्या वापरून तुम्ही परीक्षेदरम्यान आपला आहार (Diet for Exams period) व्यवस्थित ठेऊ शकता. कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. तुम्ही कोणत्याही स्तरावर कमकुवत असाल, तर तुम्ही चांगली तयारी करू शकणार नाही. तुमच्या अभ्यासाच्या योजनेबरोबरच तुम्ही संतुलित आहार योजना देखील बनवावी लागेल. चला तर मग जाणून घेउया यासंबंधीच्या काही टिप्स. अंतरानं जेवण करा तुमची भूक किंवा अन्न सेवन यांच्याशी अजिबात तडजोड करू नका. दर काही तासांनी आरोग्यदायी गोष्टी खात राहा. एकाच वेळी अनेक गोष्टी खाण्याऐवजी काही तासांत हलके आरोग्यदायी अन्नपदार्थ खा. ज्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही आणि एनर्जी राहील. तुम्हालाही Gym ट्रेनर व्हायचंय? मग शिक्षणापासून पगारापर्यंत इथे मिळेल माहिती

प्रोटिन्स आहेत महत्त्वाचे

तुमचा आहार पूर्णपणे संतुलित असावा. तुमच्या आहारात प्रोटिन्सयुक्त पदार्थांचा समावेश जरूर करा. तुम्ही मसूर, अंडी, स्प्राउट्स, दूध, दही किंवा चीज यांसारख्या गोष्टी नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत किंवा रात्रीच्या जेवणापर्यंत खाऊ शकता. बाहेरचे पदार्थ टाळा परीक्षेच्या काळात बाहेरचे अन्न खाणे टाळावे. यामुळे तुमचे आरोग्य अधिक तंदुरुस्त राहील. अनेक वेळा बाहेरचे अन्न खाल्ल्याने आरोग्य बिघडते, ज्यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होतो. भरपूर पाणी प्या पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि शरीर हायड्रेटही राहते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यामध्ये कसूर करू नका. पाणी कमी प्यायल्यानेही चिडचिड होते. आपण इच्छित असल्यास, आपण पाणी पिण्यासाठी नियमित अंतराने अलार्म देखील सेट करू शकता. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचंय? मग तुम्हाला ‘हे’ IMP स्किल्स येणं आवश्यक रोज न चुकता करा नाश्ता सकाळचा नाश्ता कधीही वगळू नका. सकाळचा पौष्टिक नाश्ता तुम्हाला दिवसभर ताजेतवाने ठेवू शकतो. तुमच्या भूक आणि मूडनुसार पूर्ण नाश्ता करून दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळेल आणि वाचलेले लक्षात राहील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात