जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Career Tips: 'हे' आहेत भरघोस पगार देणारे Government Jobs; अशा पद्धतीनं करा Preparation; वाचा सविस्तर -

Career Tips: 'हे' आहेत भरघोस पगार देणारे Government Jobs; अशा पद्धतीनं करा Preparation; वाचा सविस्तर -

कंपनीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

कंपनीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी

कमी वयापासूनच तुम्ही मेहनत करणं सुरु केलंत तर तुम्हलाही गव्हर्नमेंट जॉब (How to prepare for government Jobs) मिळू शकतो

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मार्च: भारतात आजकाल सरकारी नोकरीला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त झालं आहे. प्रत्येकाला गव्हर्नमेंट जॉब (Government Jobs) पाहिजे आहे. मात्र गव्हर्नमेंट जॉब मिळवणं तितकं सोपी नाही. यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते तसंच अंगात जिद्द असावी लागते. मात्र कमी वयापासूनच तुम्ही मेहनत करणं सुरु केलंत तर तुम्हलाही गव्हर्नमेंट जॉब (How to prepare for government Jobs) मिळू शकतो. गव्हर्नमेंट जॉब मिळाल्यानंतर तब्बल एक लाखाच्यावर पगार (salary of Government employee) मिळू शकतो. तसंच सरकारकडून विशेष सुविधाही मिळू शकतात. पण हे सर्व हवं असेल तर तुम्हाला तयारीही सुरु करावी लागेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही  सरकारी जॉब्स (Top Government Jobs) सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला लाखो पगार (Government Jobs best salaries) मिळू शकतो. चला तर मग जाणून घेउया. गव्हर्नमेंट अंडरटेकिंग (Government Undertaking companies) BHEL, IOC आणि ONGC सारख्या मोठ्या सरकारी कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी GATE (Graduate Aptitude Test in Engineering) परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या सेक्टरमध्ये दरमहा 50 हजार ते 1.5 लाख रुपये कमावता येतात. याशिवाय खाण्यापिण्यासाठी आणि प्रवासासाठी अनेक प्रकारचे भत्ते आणि इतर सुविधाही येथे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनो, JEE नंतर आवडीच्या कॉलेजमध्ये Admission हवीये? असा करा अभ्यास रेल्वे इंजिनिअर (Railway Engineer) रेल्वे अभियंता नोकऱ्यांना इतर कोणत्याही सरकारी अभियंत्यापेक्षा जास्त पगार मिळतो. सरकारी अभियंत्याचा पगार 70 हजार ते 1.5 लाख रुपये किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. रेल्वे इंजिनीअरला घर, प्रवास खर्च आणि इतर अनेक भत्तेही दिले जातात. भारतीय नागरी सेवा (Indian Civil Service) भारतीय नागरी सेवा ही भारतातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची नोकरी आहे. त्यात IAS, IPS आणि IFS सारख्या पदांचा समावेश आहे. हे अधिकारी देश चालवण्यासाठी आणि सरकारी धोरण बनवण्यासाठी मदत करतात. त्यांचा मासिक पगार 56000 ते 2.25 लाख रुपयांपर्यंत आहे. याशिवाय या अधिकाऱ्यांना बंगला, गाडी, सुरक्षा, चालक, वीज अशा अनेक सुविधा आणि भत्तेही मिळतात. संरक्षण सेवा (Defence Service) संरक्षण सेवेमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचा समावेश होतो. या अंतर्गत सर्व पदे अतिशय आदरणीय आहेत. या नोकरीसाठी NDA, CDS सारख्या परीक्षा घेतल्या जातात. या अधिकाऱ्यांचे पगार 50 हजार ते 2.50 लाख रुपयांपर्यंत असू शकतात. या सेवेत पदोन्नतीसोबतच अनेक प्रकारचे भत्ते आणि सुविधाही उपलब्ध आहेत. महिलांनो, सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 18,000 रुपये पगाराची नोकरी बँकिंग नोकरी (Banking Sector) देशातील बहुतांश तरुणांना बँक उद्योगात नोकरी करायची आहे. या क्षेत्रात प्रमोशन सहज उपलब्ध आहे. बँक पीओ परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, तुम्हाला येथे दरमहा 30 हजार ते 1.50 लाख रुपये पगार मिळू शकतो. वरिष्ठ पदावरील लोकांना दर दोन वर्षांनी बाहेर जाण्यासाठी 1 लाख रुपये आणि इतर अनेक भत्ते देखील दिले जातात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात