मुंबई, 10 मार्च: राज्यात आणि देशातील काही इतर राज्यांमध्ये बारावीची बोर्डाची परीक्षा (12th Board Exams 2022) सुरु झाली आहे. ही परीक्षा देतानाच विद्यार्थ्यांना पुढे येणाऱ्या JEE mains आणि JEE Advance या परीक्षांचंही टेन्शन (Preparation Tips for JEE mains) आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांचं IIT मध्ये किंवा NIT (How to get admission in IIT and NIT) मध्ये प्रवेश घेण्याचं स्वप्न असेल मात्र या परीक्षेसाठी नेमका अभ्यास (How to crack NIT Exams) कसा करावा हे अनेकांना माहिती नसतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला JEE नंतर चांगलं कॉलेज (How to get Good College after JEE Exam) मिळवायचं असेल तर नक्की कशा पद्धतीनं अभ्यास करावा याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घेऊया. शाळेपासूनच सुरु करा तयारी जेईईच्या तयारीसाठी विद्यार्थी बारावीनंतर कोचिंगचा सहारा घेतात, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडे वेळ कमी असतो आणि चांगली तयारी करणे शक्य नसते. 8वी किंवा 9वी सारख्या शालेय दिवसांपासून तयारीला सुरुवात करावी, असे विद्यार्थ्यांना सुचवण्यात आले आहे. जितक्या लवकर तयारी सुरू होईल, तितका वेळ विद्यार्थ्यांना मिळेल. अयशस्वी झाल्यास तयारी करा, पुन्हा तयारी करा. Career Tips: Technology च्या क्षेत्रात करिअर करायचंय? मग ‘हे’ Career Options महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास करा तयारी करताना विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की ज्या विषयांवरून जास्त प्रश्न विचारले जातात किंवा जे विषय जास्त महत्त्वाचे आहेत त्यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. काही मोजक्याच विषयांची तयारी करणे असे अजिबात नाही. तयारी पूर्ण असली पाहिजे पण परीक्षेत ज्या विषयांना जास्त वेटेज आहे त्यावर जास्त लक्ष असायला हवे. उजळणीवर भर द्या JEE परीक्षेशी संबंधित अनेक पुस्तके आणि साहित्य बाजारात उपलब्ध आहेत. अनेक विद्यार्थी एकाच विषयासाठी अनेक पुस्तके वापरतात, ज्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. जेव्हा अनेक पर्याय उपलब्ध असतील तेव्हा कन्फ्युजन वाढतच जाईल. म्हणूनच विद्यार्थ्यांनी कोणतेही एक पुस्तक वापरून रिव्हिजनवर अधिक भर द्यायला हवा. IT क्षेत्रातील महिलांना मानवलं WFH; नोकरी सोडणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी घट सराव महत्त्वाचा सराव हा प्रत्येक परीक्षेचा आधार असतो. प्रश्नांचा जितका सराव कराल तितक्या संकल्पना मनात स्पष्ट होतील. तोच प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा आणि चूक झाल्यास पुन्हा सराव करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.