जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MPSC Tips: गेल्या परीक्षेतील चुकांमुळे खचून जाऊ नका; यंदा अशी करा तयारी; एका झटक्यात क्रॅक होईल परीक्षा

MPSC Tips: गेल्या परीक्षेतील चुकांमुळे खचून जाऊ नका; यंदा अशी करा तयारी; एका झटक्यात क्रॅक होईल परीक्षा

MPSC ची चांगली तयारी

MPSC ची चांगली तयारी

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (MPSC preparation Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही MPSC ची चांगली तयारी शकाल आणि MPSC crack करू (how to crack MPSC) शकाल. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 02 जुलै: MPSC परीक्षा पास (How to pass MPSC) करण्यासाठी जाऊन परीक्षा परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झालो असं होत नाही. देशातील काही महत्त्वाच्या आणि कठीण परीक्षांपैकी एक अशी MPSC परीक्षा आहे. अनेक जणांची कित्येक वर्ष MPSC चा अभ्यास (How to study MPSC) करताना निघून जातात मात्र यश मिळत नाही. खरं तर MPSC चा अभ्यास मन लावून आणि योजना आखून (How to make plan for MPSC preparation) केला तर यात काहीच कठीण नाही. ज्या विद्यार्थ्यांना यात यश (Success Tips) मिळू शकत नाही ते आपल्या चुकांमधून कधी बोधच घेत नाहीत. पूर्वी केलेल्या चुका वारंवार करतात आणि म्हणूनच त्यांना यश मिळत नाही. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (MPSC preparation Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही MPSC ची चांगली तयारी शकाल आणि MPSC crack करू (how to crack MPSC) शकाल. चला तर मग जाणून घेऊया. फक्त MPSC च नाही तर कोणत्याही सरकारी परीक्षेचा अभ्यास करताना परीक्षेची तयारी करण्यासाठी प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चालू घडामोडींची माहिती ठेवा. MPSC परीक्षेत चालू घडामोडी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराने दररोज वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावावी तसंच ऑनलाईन करंट अफेअर्सच्या काही टेस्टही द्याव्यात. राज्यात शिक्षकांसाठी जॉबची बंपर लॉटरी! नवोदय विद्यालय समितीत 1616 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज अनेकदा तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल की नाही हे तुमच्यातील आत्मविश्वासावर अवलंबून असते. त्यामुळे अभ्यास करताना किंवा परीक्षेची तयारी करताना आत्मविश्वास ढासळू देऊ नका. तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि परीक्षेला सामोरे जा. काही उमेदवार अनेक वर्षांपासून MPSC परीक्षेची तयारी करतात (MPSC Exam Preparation Tips), तर काही त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करतात. वास्तविक, येथे संपूर्ण खेळ फक्त योग्य रणनीतीचा आहे. जर तुम्ही सुरुवातीपासूनच योग्य नियोजन केले तर MPSC प्रिलिम्स, मुख्यआणि मुलाखत हे तिन्ही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होतात. त्याच वेळी, जर तुम्ही तुमच्या चुकांमधून धडा घेतला नाही, तर अनेक प्रयत्न करूनही तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. शिक्षण 8वी असो वा ग्रॅज्युएशन तुमची सरकारी नोकरी पक्की; पुण्यात जॉबची संधी परीक्षेसाठी स्वत:ची मानसिक तयारी करा. आव्हाने आणि अपयशाला सामोरे जाताना हार न मानण्याचा संकल्प करा. मॉक टेस्टमध्ये नापास झाल्यानंतर प्रत्येक वेळी तुमच्या चुकांचे विश्लेषण करा. मग त्या सुधारा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पुढे जा. MPSC परीक्षेची तयारी करत असताना, तुम्ही प्री आणि मेनसाठी तुमची स्वतंत्र रणनीती बनवावी. तुम्ही दोन्ही परीक्षांची तयारी एकत्रच करावी, कारण प्री नंतर मेनसाठी जास्त वेळ मिळत नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात