Home /News /career /

Career Tips: महिलांनो, आता स्वतः तयार करा दागिन्यांचे Designs; ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करा करिअर

Career Tips: महिलांनो, आता स्वतः तयार करा दागिन्यांचे Designs; ज्वेलरी डिझायनिंगमध्ये करा करिअर

ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या संधी

ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या संधी

आज आम्ही तुम्हाला ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या (Career in Jewellery Designing) संधींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 24 मे: दागिन्यांची आवड नसेल अशी एकही महिला शोधून सापडणार नाही. दागिने (Jewellery) म्हंटलं की महिला अगदी आनंदित होतात. लग्नसमारंभ असो की सण महिला सतत ज्वेलरी आणि दागिने घालण्यासाठी उत्साही असतात. मात्र सोनं (Gold) आणि चांदीच्या (Silver) वाढत्या दरांमुळे दागिने खरेदी करणं आता कठीण झालं आहे. पण हे दागिने आणि त्यांच्यावरील निरनिराळ्या डिझाइन्स (Different jewellery Designs) येतात तरी कुठून? किंवा दागिन्यांना डिझाईन कोण देतं? असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? जर तुमचं उत्तर हो असेल तर हेच काम तुम्हीही करू शकता. आज आम्ही तुम्हाला ज्वेलरी डिझाईनिंगमधील करिअरच्या (Career in Jewellery Designing) संधींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. काय आहे ज्वेलरी डिझाईन? ज्वेलरी डिझाइन ही वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवण्याची कला आहे. सोने, चांदी, मोती, प्लॅटिनम (Platinum) इत्यादी धातूंचे कोरीव काम करून. वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनवले जातात. त्याचप्रमाणे हस्तिदंत, दगड, ऑयस्टर इत्यादींचा वापर स्टाइलिश दागिने तयार करण्यासाठी केला जातो. ज्वेलरी डिझाइनर असे असतात जे दागिन्यांची शैली, नमुना इत्यादी सेट करतात. 10वी, 12वी उत्तीर्णांनो, देशसेवेची संधी सोडू नका; BSF मध्ये 281 जागांसाठी भरती
  हे शिक्षण असणं आवश्यक
  दहावी पास आउटसाठीही ज्वेलरी डिझाईन हा एक उत्तम करिअर पर्याय आहे. दहावीनंतर तुम्ही शॉर्ट टर्म कोर्सेस करू शकता. इच्छुकांना पुढील कोर्ससाठी योग्यता परीक्षा द्यावी लागते. त्यानंतरच तुम्ही कोर्ससाठी अर्ज भरू शकता. तसंच तुम्ही बारावी आणि ग्रॅज्युएशननंतरही हा कोर्स करू शकता. काही टॉप कोर्सेस बेसिक ज्वेलरी डिझाईन डायमंड आइडेंटीफिकेशन आणि ग्रेडिंग ज्वेलरी डिझाईनमध्ये बीएससी बॅचलर ऑफ ज्वेलरी डिझाईन अ‍ॅक्सेसरीज डिझाईन बॅचलर ज्वेलरी डिझाईन आणि जेमोलॉजी मध्ये डिप्लोमा कॅडसह अ‍ॅडव्हान्स ज्वेलरी डिझाईन हे आहेत टॉप कॉलेजेस जेमोलॉजी इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई. सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई. जेम्सस्टोन आर्टिझन्स ट्रेनिंग स्कूल, जयपूर. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेमोलॉजी, नवी दिल्ली. रत्न व दागिन्यांची निर्यात जाहिरात परिषद, जयपूर. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली. करिअरच्या संधी शिक्षणानंतर तुम्ही कोणत्याही दागिने तयार करणाऱ्या कंपनीमध्ये जॉब करू शकता. तसंच तुम्ही ज्वेलरी डिझाईन करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. Interview Tips: जॉबच्या मुलाखतीला जाताना नेहमी कपड्यांकडे द्या लक्ष; अन्यथा.....
  इतका मिळेल पगार
  जर तुम्ही फ्रेशर म्हणून कोणत्या दागिने बनवणाऱ्या कंपनीमध्ये जॉब करत आहात तर तुम्हाला 8 -10 हजार पगार मिळू शकतो. अनुभवसानुसार पगार वाढत जातो. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु केला आहे तर तुम्हाला ऑर्डरनुसार पैसे मिळतील.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Jewellery shop, Job

  पुढील बातम्या