जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / फ्रेशर्स उमेदवारांनो, करिअरचं क्षेत्र कुठलंही असो Resume महत्वाचा; इथे जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

फ्रेशर्स उमेदवारांनो, करिअरचं क्षेत्र कुठलंही असो Resume महत्वाचा; इथे जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

Resume बनवण्याच्या काही टिप्स

Resume बनवण्याच्या काही टिप्स

तुम्हीही फ्रेशर असाल आणि तुम्हाला पहिल्याच Interview मध्ये जॉब (How to make resume for any job) हवा असेल तर Resume बनवण्याच्या काही टिप्स आज आम्ही तुम्हाला देणार आहोत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे: कोणताही जॉब मिळवण्यासाठी सुरुवातीला त्या कंपनी तुम्हाला Resume देणं आवश्यक असतं. जर त्या कंपनीतील वरिष्ठांना तुमचा Resume आवडला (Resume Tips) तरच तुम्हाला पुढील प्रोसेससाठी संधी दिली जाते. पण जर तुमच्या Resume मध्ये चुका (Common mistakes in Resume) असतील तर तुम्हाला कधीच बोलावण्यात येणार नाही. एका सामान्य कागदासारखी त्या Resume ची किंमत होईल. पण तुम्हाला जर तुमचा Resume असामान्य (How to make best resume) बनवायचा आहे तर हे करणं अगदी सोपं आहे. तुम्हीही फ्रेशर असाल आणि तुम्हाला पहिल्याच Interview मध्ये जॉब (How to make resume for any job) हवा असेल तर Resume बनवण्याच्या काही टिप्स (Resume making Tips) आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला जॉब मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेउया. बर्‍याच संशोधनातून असे दिसून आले आहे की बहुतेक कंपन्यांचे एचआर उमेदवाराच्या रेझ्युमेवर 7 सेकंद घालवतात. याचा अर्थ असा की पुढील फेरीसाठी उमेदवार निवडायचा की नाही हे 7 सेकंदात ते ठरवतात. तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल, तर तुमचा रेझ्युमे एडिट करा आणि तो योग्य फॉरमॅटनुसार बनवा. तुम्हालाही LLB करायचंय? मग CLAT Exam साठी अशा पद्धतीनं करा अभ्यास; वाचा टिप्स Resume ची सुरुवात ठरवेल भविष्य तुमचे स्किल्स आणि हायलाइट्सच्या सारांशाने Resume सुरू करा. हे तुमच्या Resume कडे HR ला पटकन आकर्षित करेल. हे वैयक्तिक प्रोफाइल तुमच्या Resume चा एक आवश्यक भाग आहे आणि HR ला तुमच्या कामाची थोडक्यात माहिती देते. म्हणूनच पर्सनल प्रोफाइलमध्ये स्वतःबद्दल चांगली माहिती लिहिण्यास विसरू नका. तुमची प्रोग्रेस सांगा तुमच्या भूतकाळातील जबाबदाऱ्या सूचीबद्ध करण्याऐवजी, तुमची प्रोग्रेस दर्शवण्यासाठी डेटा आणि रेकॉर्ड वापरा. तुमच्या कामाच्या परिणामांवर भर देऊन तुमचा Resume इतरांपेक्षा वेगळा बनवा. NEET UG 2022: रजिस्ट्रेशनसाठी कोणती कागदपत्रं IMP; किती असेल शुल्क; वाचा

पोस्टनुसार Resume एडीट करा

तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात त्या पोस्टनुसार तुमच्या Resume ला एडिट करा. तुम्ही या जॉबसाठी योग्य का आहेत हे Resume मध्ये लिहा. यामुळे तुम्हाला जॉब मिळण्यास मदत होईल. .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career
  • First Published :
जाहिरात
जाहिरात