मुंबई, 10 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) लवकरच जाहीर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, CBSE 12वी बोर्ड परीक्षेच्या प्रतींचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचे गुण आता वेबसाइटवर ऑनलाइन अपलोड केले जात आहेत. अशा परिस्थितीत, आता अंदाज वर्तवला जात आहे की सीबीएसई 12वी बोर्डाचा निकाल 15 जुलै 2022 पर्यंत जाहीर होऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी बोर्डाच्या cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि parikshasangam.cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या रोल नंबरच्या आणि जन्मतारीख मदतीने निकाल तपासू शकतील. Google की Facebook? जॉबसाठी नक्की कोणती कंपनी आहे बेस्ट; अशी असते Career Growth
CBSE 12वीच्या निकालात उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 33 टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र विद्यार्थ्यांना 1 किंवा 2 विषयांमध्ये किमान गुणांपेक्षा कमी गुण मिळाल्यास, विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेत बसण्याची संधी दिली जाईल. परंतु विद्यार्थ्याला 2 पेक्षा जास्त विषयात 33 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाल्यास त्याला अनुत्तीर्ण घोषित केले जाईल.
CBSE बोर्डाचा निकाल असा तपासा सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रथम अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध CBSE 12वी निकाल 2022 लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन पृष्ठ उघडेल, येथे तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. CBSE 12वी बोर्डाचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि सेव्ह करा. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना ताण येतोय? चिंता नको; ‘या’ टिप्स फॉलो कराच
असा बघा SMS द्वारे निकाल
वेबसाइटशिवाय विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल पाहता येणार आहे. यासाठी त्यांना त्यांच्या फोनवरून CBSE 12 स्पेशल रोल नंबर टाइप करून 5676750 वर मेसेज पाठवावा लागेल. निकाल तुमच्या फोनवर एसएमएसच्या स्वरूपात पाठवला जाईल.