मुंबई, 08 एप्रिल: सध्या सर्व अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट (Campus Placement) सुरु आहे. बाहेरून जेणेक कंपन्या येऊन त्या त्या क्षेत्रातील उमेदवारांना जॉब ऑफर (Campus placement jobs) करत आहेत. यामध्ये ज्या विद्यार्थी पात्र आहेत त्यापैकी काही विद्यार्थ्यांची निवडही होत आहे. तर काही विद्यार्थ्यांच्या पदरी मात्र निराशा येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जॉब (How to get jobs in Campus placement) मिळू शकला नाही असे विद्यार्थी टेन्शन घेऊन बसतात. आता यापुढे जॉब कसा मिळवावा (How to get Job in Campus placement) हे अशा विद्यार्थ्यांना कळू शकत नाही. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही जॉब सर्चिंग वेबसाईट्सबद्दल (Unique jobs websites) सांगणार आहोत. जिथे तुम्हाला नक्की भरघोस पगाराचा जॉब (Job searching websites) मिळू शकेल. चला तर मग जाणून घेऊया. Campus Placement मध्ये आता तुम्हालाच मिळेल जॉब; असा Crack करा Group Discussion राउंड जॉब शोधण्यासाठी (Job search) आजकालच्या टेक्नॉलॉजीच्या (Technology) काळात कुठेही बाहेर जाण्याची गरज पडत नाही. टेक्नॉलॉजीमुळे ऑनलाईन (Online jobs) आणि सोशल मीडियावरच जॉब (Job search on Social Media) शोधण्यासाठी आणि जॉब्सबद्दल माहिती देण्यासाठी अनेक वेबसाईट्स (Job searching websites) उपलब्ध असतात. आज आम्ही तुम्हाला अजूनही अशा काही जॉब सर्चिंग वेबसाईट्सबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या उपयोग करून तुम्ही चांगला जॉब मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. हायरेक्ट (Hirect) हायरेक्ट त्याच्या पडताळणी, थेट चॅट, व्हॉईस कॉलिंग आणि व्हिडिओ कॉलिंग वैशिष्ट्यांसह कंपन्या आणि नोकरी शोधणार्यांमध्ये थेट संवाद साधण्यास प्रोत्साहित करते. या वेब पोर्टलची रचना स्टार्टअपसाठी सर्वात योग्य आहे. 50,000 हून अधिक व्हेरीफाईड स्टार्टअप्स आणि सुमारे 10 लाख लोक संधी शोधण्यासाठी Hirect चा वापर करतात. या पोर्टलचा अनोखा अल्गोरिदम नोकऱ्या शोधण्याच्या प्रक्रियेला गती देतो आणि तुम्हाला तुमच्या प्रोफाइलला अनुरूप संधी शोधण्यात मदत करतो. फ्रेशर्सवर्ल्ड (FreshersWorld) 60,000 रिक्रूटर्स आणि 1.5 कोटी यूजर्ससह, FreshersWorld हे केवळ तरुण अर्जदार आणि अलीकडील कॉलेज पास-आउटसाठी तयार केलेले जॉब पोर्टल आहे. हे नोकरी शोधणाऱ्यांसाठी विनामूल्य आहे आणि त्याच्या वैशिष्ट्यीकृत विभागातील यादी IT, सरकारी नोकऱ्यांपासून संरक्षण क्षेत्रापर्यंत आहे. त्यामुळे फ्रेशर्सना नोकरी शोधण्यात अडचण येत नाही. इन्डीड (Indeed) हे यूएस-आधारित जॉब पोर्टल 70 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे आणि त्याचा वापर प्रामुख्याने Google वर नोकरी शोधण्यासाठी केला जातो. हे पोर्टल भारतात मोठ्या प्रमाणात वापरला जाते. नॉन-टेक्निकल नोकऱ्यांसाठी सर्वात योग्य हे वेब पोर्टल आहे. जॉब पोस्टिंगचे शुल्क त्याच्या स्पर्धात्मक वेबसाइट्सपेक्षा इथे कमी आहे, ज्यामुळे अनेक कंपन्यांना या पोर्टलवर नोकरीची संधी पोस्ट करण्यात अडचण होत नाही. यामुळे अनेकांना याद्वारे जॉब मिळू शकतो. Career Tips: SBI मध्ये तुम्हालाही मिळू शकते क्लर्क म्हणून नोकरी; आधी समजून घ्या Exam Pattern ग्लासडोअर (Glassdoor) Glassdoor वेबसाइटवर नोकरी शोधणाऱ्यांना पारदर्शकता प्रदान करते. जॉब पोस्टिंग व्यतिरिक्त, पोर्टलच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे यूजर्स एकाच नोकरीसाठी वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या पगाराची तुलना करू शकतात. या वेबसाइटद्वारे ब्राउझ केल्यावर, तुम्ही कंपनीच्या वर्तमान आणि माजी कर्मचार्यांनी दिलेला अभिप्राय आणि रेटिंग शोधू शकता. ही मोफत वैशिष्ट्ये नोकरी शोधणार्यांना विशिष्ट कंपनीत काम कसे करायचे याची कल्पना देतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.