मुंबई, 06 एप्रिल: आजकाल कोणत्याही कॉलेजममध्ये प्रवेश घेताना तिथे यणाऱ्या कंपनी आणि जॉबच्या संधींबद्दल (Job Opportunity) आपल्याला माहिती दिली जाते. काही मोठ्या कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट सेलही (Campus Placement Jobs) असतात ज्यांच्यामार्फत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना जॉब करण्याची संधी दिली जाते. या प्लेसमेंट्समध्ये (How to get job through Placement) अनेक मोठमोठ्या कंपन्या येतात आई अनेकांना नोकरीची ऑफर (How to accept Job Offer) देतात. इंजिनिअरिंग, MBA या कोर्सेसच्या कॉलेजमध्ये येणाऱ्या कंपन्या (Jobs in Engineering Colleges) या मोठ्या आणि MNC असतात त्यामुळे त्यांची सिलेक्शन प्रोसेस (Selection process in campus placement) बरीच कठीण असते. आधी टेक्निकल टेस्ट (Technical test) त्यानंतर ग्रुप डिस्कशन (Group discussion tips) आणि त्यानंतर पर्सनल मुलाखत अशा पद्धतीनं उमेदवारांची निवड होते. या सर्व प्रोसेसमध्ये अनेक विद्यार्थ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. ग्रुप डिस्कशनमध्ये (How to crack Group Discussion in Job Interview) सर्वाधिक जणांना रिजेक्ट केलं जातं.मात्र आता चिंता नको आज आम्ही तुम्हाला ग्रुप डिस्कशनमध्ये (Group Discussion Do’s and Don’ts) नक्की कसं बोलावं, काय करावं काय करू नये याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. Career Tips: टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरघोस पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ क्षेत्रांमध्ये करिअरला करा सुरुवात हे आवर्जून करा Group Discussion चा विषय जाहीर झाल्यावर नीट ऐका आणि समजून घ्या. तुम्हाला ज्या मुद्द्यावर जोर द्यायचा आहे त्याची यादी बनवा. जर तुम्हाला विषयाबद्दल ज्ञान असेल आणि पुरेसे मुद्दे असतील तर तुम्ही Group Discussion च्या मूलभूत गोष्टी सुरू करू शकता. 3-4 वेळा 25-30 सेकंदांचे छोटे वाक्य अबोला आणि आपले मुद्दे मांडा. अतिशयोक्ती करू नका, इतरांनाही बोलण्याची संधी द्या. प्रत्येक सदस्याच्या योगदानाचा आदर करा आणि तुम्ही बोलण्याची योग्य वेळ ओळखा. जर तुम्ही एखाद्या मुद्द्याशी सहमत नसाल तर विनम्रपणे असहमत व्हा कारण ती चर्चा आहे आणि वाद नाही. बोलण्याचा प्रयत्न करा आणि चांगली छाप पाडा, तुमचं Group Discussion स्किल्स सर्वांना दाखवा. तुम्ही एखाद्या मुद्द्यावर चर्चा करत असताना ग्रुप सदस्यांवर लक्ष हेवा आणि त्यांच्याकडेच बघून बोला. तुमचे कपडे हे नेहमी फॉमल आणि लाईट रंगाचे असू द्या. उमेदवारांनो, स्पर्धा परीक्षांच्या कोणत्या विषयासाठी कुठलं पुस्तक बेस्ट? वाचा हे कधीच करू नका Group Discussion दरम्यान गरजेपेक्षा जास्त बोलू नका किंवा दुसऱ्याची बोलण्याची संधी हिरावून घेऊ नका. ग्रुप डिस्कशन दरम्यान वाद घालू नका किंवा ओरडू नका. कोणत्याही प्रकारच्या पुष्टीकरणासाठी GD पॅनेलकडे पाहू नका. विषयाशी संबंधित नसलेल्या अप्रासंगिक गोष्टींबद्दल बोलू नका चर्चेवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करू नका. बोट दाखवणे आणि टेबल थंपिंगसारखे जेश्चर आक्रमक दिसू शकतात ते वेळोवेळी टाळण्याचा प्रयत्न करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.