तुम्हीपण Fresher आहात? Resume कसा तयार करायचा माहिती नाहीये? मग फॉलॉ करा या टिप्स

आज आम्ही तुम्हाला Resume तयार करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

आज आम्ही तुम्हाला Resume तयार करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • Share this:
    मुंबई, 21 जून : कोरोना व्हायरसनं (Corona virus) जगभरात थैमान घातलं आहे. लॉकडाउनमुळे बहुतांश लोंकांना घरूनच काम करावं लागत आहे. तर कंपन्यांची आर्थिक स्थिती खराब झाल्यामुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. मात्र या सर्व गोष्टींमध्ये आता ग्रॅज्युएट (Graduate Freshers) झालेले फ्रेशर्स अडचणीत सापडले आलेत. अशा परिस्थितीत जॉब (Freshers jobs) मिळणार कसा? असा प्रश्न त्यांना पडला आहे. मात्र चिंता करू नका. तुम्हीही फ्रेशर असाल आणि नोकरी शोधत असाल तर तुम्हाला नोकरी नक्की मिळणार. त्यासाठी Resume (tips for freshers resume) चांगला असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला Resume तयार करण्यासाठी काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. एक चांगलं Template निवडा एक चांगला Resume बनवण्यासाठी चांगलं Template असणं आवश्यक आहे. यासाठी जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला अधिक मेहनत करण्याची गरज नाही. इंटरनेटवर असंख्य टेम्प्लेट तुम्हाला मिळतील. मात्र या टेम्प्लेटमध्ये माहिती कशी आणि कोणती द्यायची यावर तुम्हाला नोकरी मिळणार की नाही हे अवलंबून आहे. Contact डिटेल्स जरूर लिहा तुमच्या Contact डिटेल्स (Contact details) या resume मध्ये नक्की लिहा. शक्य असल्यास resume च्या डाव्या बाजूला वरती या डिटेल्स लिहा. यात तुमचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि संपूर्ण पत्ता लिहा. पिन कोड टाकायला विसरू नका. तसंच मोबाईल नंबर देताना तो नंबर चालू आहे ना याची खात्री करून घ्या. हे वाचा -महत्त्वाची बातमी! करिअर निवडताना संभ्रमात आहात? मग या गोष्टींकडे द्या लक्ष Career Objective लिहिणं महत्वाचं Resume च्या सुरुवातीला Career Objective म्हणजेच तुमच्या करिअरमधील तुमचं ध्येय काय आहे हे लिहायला विसरू नका. Career Objective साठी काही अनुभवी लोकांचं मागदर्शन घ्या. तसंच तुम्हाला ज्या जॉबसाठी अप्लाय करायचं आहे त्या जॉबच्या मागणीनुसार करिअर ऑब्जेक्टिव्ह ठरवा. शिक्षणाबद्दल माहिती द्या फ्रेशर्सना अनुभव नसल्यामुळे Resume मध्ये शिक्षण (Educational qualification)  आणि मार्क्सना भरपूर महत्त्व आहे. त्यामुळे न चुकता शिक्षणाबाबत माहिती लिहा. तसंच माहिती देताना आधी उच्च शिक्षण, त्यानंतर बारावी आणि त्यानंतर दहावी अशा उतरत्या क्रमात माहिती द्या. इतर स्पर्धांबद्दल माहिती द्या तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये कोणता खेळ खेळत असाल किंवा चित्रकलेच्या परीक्षा दिल्या असतील किंवा कोणत्या कार्यक्रमात बक्षीस मिळालं असेल तर याबाबत resume मध्ये माहिती द्यायला विसरू नका. तुमच्या छंदांबाबत लिहा तुम्हाला असलेले छंद आणि आवडी निवडीबाबत resume मध्ये नक्की लिहा. यामुळे तुमचं व्यक्तिमत्व ओळखण्यास मदत होईल. लक्षात ठेवा resume मध्ये चुकीची आणि खोटी माहिती लिहू नका.
    Published by:Atharva Mahankal
    First published: