Home /News /career /

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! करिअर निवडताना संभ्रमात आहात? मग या गोष्टींकडे द्या लक्ष

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! करिअर निवडताना संभ्रमात आहात? मग या गोष्टींकडे द्या लक्ष

आता चिंता करू नका. तुमच्यासाठी योग्य करिअर तुम्हीच निवडू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

    मुंबई, 17 जून : कोरोना महामारीचा (Corona virus) काळ असल्यामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन शिक्षण (Online education) घ्यावं लागतंय. त्यात महाराष्ट्र बोर्डानं (MH state board) आणि CBSE नं दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exam) रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अनेक बाबतीत संभ्रम निर्माण झाले आहेत. दहावी आणि बारावीनंतर पुढे काय? कोणतं करिअर (How to choose career) निवडावं? मित्र-मैत्रिणी जे निवडताहेत तेच निवडावं का? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. मात्र आता चिंता करू नका. तुमच्यासाठी योग्य करिअर तुम्हीच निवडू शकता. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडले आहेत. सुरळीत शाळा आणि कॉलेज सुरु असताना अनेकवेळा विद्यार्थ्यांना मित्रांचा आणि शिक्षकांचा सहवास लाभतो. विशेष करून बोर्डाची परीक्षा जवळ असताना विद्यार्थ्यांना त्याप्रमाणे शिक्षकांचं मार्गदर्शन लाभत होतं. मात्र कोरोनामुळे शाळा बंद आहेत म्हणूनच विद्यार्थी संभ्रमात आहेत. मात्र करिअर निवडताना कोणालाही न विचारता तुमच्या अंतरमनाला याबद्दल विचारणं आवश्यक आहे. हे वाचा - शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी विद्यार्थ्यांना प्रवेश द्या : शिक्षण विभाग असं निवडा योग्य करिअर आवड ओळखणं आवश्यक अनेकदा विद्यार्थी करिअर निवडताना एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर ठेऊन करिअरकडे वाटचाल करतात. मात्र स्वतःला काय आवडतं याबाबत दुर्लक्ष करतात. यामुळे नुकसान होऊ शकतं. आवड नसल्यामुळे त्या करिअरमध्ये शिक्षण आणि नोकरी आपण किती काळ करू शकणार याची खात्री नसते. म्हणूनच करिअर निवडताना तुम्हाला कोणत्या क्षेत्रात अधिक आवड आहे याबाबत विचार करा. कुठल्या क्षेत्रात काम केल्यामुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही याचा विचार करूनच करिअर निवडा. तुमच्या व्यक्तिमत्वाला जाणून घ्या करिअर निवडताना तुमचं व्यक्तिमत्व (Personality development) नक्की कसं आहे याबद्दल जाणून घ्या. तुम्हाला काय केल्यानं आनंद मिळतो. तुमचा स्वभाव कसा आहे याबद्दल स्वतःच ओळखा. याबद्दल तुमच्या आई-वडिलांशी नक्की चर्चा करा आणि करिअर निवडा. थोरामोठ्यांशी आणि अनुभवी लोकांशी बोला करिअर निवडताना अनुभवी लोकांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तसंच तुम्हाला आवडणाऱ्या क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून घ्या. त्यांना तुमच्या शंका विचारा. यामुळे तुम्हाला करिअर निवडण्यात अडचणी येणार नाहीत. करिअर काउंसिलरला भेटा करिअर निवडताना अगदीच मोठा गोंधळ होत असेल तर आजकाल अनेक करिअर काउंसिलर असतात जे तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू शकतात आणि तुमच्या मनातील संभ्रम दूर करू शकतात. त्यामुळे योग्य गाईड करणाऱ्या करिअर काउंसिलरला भेटा. हे वाचा - 12वीत किती गुण मिळणार, असा स्वत:च तयार करू शकता रिझल्ट; पाहा Formula तुमचा आनंद महत्वाचा लक्षात ठेवा करिअर निवडताना तुमचा आनंद कोणत्या क्षेत्रात आहे हे ओळखा. पैशांच्या मागे जाऊ नका. तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे तेच क्ष्रेत्र निवडा. संपूर्ण आयुष्य खुश राहू शकाल असंच क्षेत्र निवडा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Mumbai

    पुढील बातम्या