जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / महिलांनो, नर्सिंग क्षेत्रात तुच्यासाठी आहेत करिअरच्या अनेक संधी; नर्स होण्यासाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

महिलांनो, नर्सिंग क्षेत्रात तुच्यासाठी आहेत करिअरच्या अनेक संधी; नर्स होण्यासाठी इथे मिळेल संपूर्ण माहिती

नर्सिंग क्षेत्रात करिअर

नर्सिंग क्षेत्रात करिअर

आज आम्ही तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर (Career in Nursing) कसं करावं आणि त्यासाठी शिक्षण कसं घ्यावं याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 मार्च: कोरोनामुळे जगभरात सर्वांनाच आरोग्याचं (Career in Health sector) महत्त्वं पटत चाललं आहे. कोरोनामुळे झालेली जीवितहानी, रुग्णालयातील रुग्णांचे होणारे हाल आणि इतर सर्वच गोष्टी या कधीच विसरू न शकणाऱ्या आहेत. या काळात डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने (Career as Nursing Staff) केलेली रुग्णांची सेवा उल्लेखनीय आहे. त्यामुळेच मेडिकल आणि नर्सिंग क्षेत्राला (Career in Nursing Sector) आजकालच्या काळात प्रचंड स्कोप आहे. विशेष करून महिला ज्या जॉबच्या (Jobs for Women) शोधात असतील अशा महिलांसाठी नर्स म्हणून करिअरच्या (Career opportunity for women as Nurse) संधी आहेत. जर तुम्हीही नर्स (How to become Nurse) होऊ इच्छित असाल आणि याबद्दल शिक्षण कसं घेणार याबद्दल संभ्रमात असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला नर्सिंग क्षेत्रात करिअर (Career in Nursing) कसं करावं आणि त्यासाठी शिक्षण कसं घ्यावं याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. नर्स होण्यासाठी लागणारी पात्रता नर्स होण्यासाठी आपल्या देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळातून दहावी (डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी) आणि बारावी विज्ञान शाखेत किमान 45% गुणांसह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी नर्स होण्यासाठी काही कोर्सेस करू शकतात. आईमध्ये डिप्लोमा कोर्सेस, डिग्री कोर्सेस आणि मास्टर कोर्सेसही आहेत. शिक्षण नसेल तरीही कमवू शकता भरघोस पैसे; Event Management मध्ये करा Career

 हे कोर्सेस महत्त्वाचे

डिप्लोमा कोर्सेस सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाइफ - 18 महिने जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ - 3 - 5 वर्षे डिग्री कोर्सेस B.Sc – नर्सिंग (बेसिक) – ४ वर्षे B.Sc – नर्सिंग (पोस्ट बेसिक) – 2 वर्षे B.Sc – नर्सिंग (अंतर) – ३ वर्षे उमेदवारांकडे हे स्किल्स असणं आवश्यक व्यक्तीच्या स्वभावात दयाळूपणा आणि नेहमी इतरांना मदत करण्याची सवय असावी. त्या व्यक्तीची संवादाची पद्धत चांगली असावी जेणेकरून त्यांना पेशंट्सचा मुद्दा समजू शकेल आणि त्यांचा दृष्टिकोन त्यांना समजावून सांगता येईल. टीमवर्कची गुणवत्ता देखील महत्त्वाची आहे कारण त्यांना डॉक्टर आणि इतर परिचारिकांसह एकत्र काम करावे लागेल. लांब शिफ्टमध्ये आणि दबावाखाली काम करण्यासाठी तग धरण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी रहा. गंभीरपणे आजारी किंवा मानसिक अस्वस्थता असलेल्या रुग्णांना हाताळण्यात कुशल असणं आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायाशी एकनिष्ठ राहा आणि व्यवसायातील नैतिक मूल्ये आणि नैतिकता पाळणे आवश्यक आहे GRE म्हणजे नक्की काय? परदेशात शिक्षणासाठी कशी द्याल GRE? वाचा संपूर्ण माहिती

 इतका मिळतो पगार

साधारणतः नवीन नर्सला सुरुवातीला 15 ते 20 हजार रुपये मासिक पगार मिळतो. काही वर्षांच्या अनुभवानंतर, एका नर्सला साधारणपणे 30 - 40 हजार रुपये मासिक आणि 15 - 20 वर्षांचा या क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या परिचारिकेला सरासरी 50 हजार - 80 हजार रुपये मासिक किंवा त्याहून अधिक वेतन पॅकेज मिळते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: career , job
  • First Published :
जाहिरात
जाहिरात