मुंबई, 27 मार्च: आजकालच्या काळात कोणताही कार्यक्रम असो तो कार्यक्रम संपूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी अनेक परिश्रम घ्यावे लागतात.घरातील काही महत्त्वाचा कार्यक्रम (Career in Event Management) असेल तर काम करावे लागतात. मात्र अनेक लोक यासाठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला (Event Management Companies) कॉन्ट्रॅक्ट देतात. म्हणूनच कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडू शकता. मात्र तुम्हीही यात करिअर (how to become Event Manager) करू शकता. आज आम्ही तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये करिअर (Career as Event Manager) कसं करणार याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेउया. Study Abroad: GRE म्हणजे नक्की काय? परदेशात शिक्षणासाठी कशी द्याल GRE? वाचा संपूर्ण माहिती जर तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स करायचा असेल तर तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुण मिळाले पाहिजेत त्यानंतर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंटमधील बीबीए आणि बीए कोर्ससाठी अर्ज करू शकता. या अभ्यासक्रमांचे प्रवेश इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीद्वारे केले जातात. मात्र काही विद्यापीठे निवड प्रक्रियेसाठी प्रवेश परीक्षा देखील घेतात. काय असतात इव्हेंट मॅनेजरची कामं इव्हेंट मॅनेजरच्या जबाबदाऱ्या इव्हेंट आणि व्यवसायानुसार बदलू शकतात. कोणत्याही कार्यक्रमात व्यवस्थेशी संबंधित सुविधांसाठी इव्हेंट मॅनेजर जबाबदार असतो. बर्याच मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंट फर्मना मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट मीटिंग आणि विशेष कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले जाते. कॉर्पोरेट, मार्केटिंग, पब्लिक रिलेशन्स डिपार्टमेंटमध्ये वारंवार इव्हेंट्स होतात, त्यामुळे तुम्ही त्यांच्या स्पेशल इव्हेंट स्टाफिंगचा भाग म्हणून तुमचे कौशल्य इथे वापरून पाहू शकता. उमेदवारांनो, नवीन जॉब जॉईन करताय? मग सुरुवातीला तपासून घ्या या गोष्टी; अन्यथा…
असं करा अप्लाय
जर तुम्हाला इव्हेंट मॅनेजमेंट इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची इच्छा असेल, तर हे क्षेत्र तुम्हाला खरोखरच सुवर्णसंधी देते. इव्हेंट मॅनेजमेंट केल्यानंतर, इव्हेंट प्लॅनर, इव्हेंट मॅनेजर, एक्झिबिशन ऑर्गनायझर, स्टेज डेकोरेटर, मॅरेज प्लॅनर, लॉजिस्टिक्स मॅनेजर इत्यादी अनेक प्रकारे तुम्ही तुमचे करिअर आजमावू शकता. या प्रकारच्या जॉब प्रोफाइलमधील कामगार कोणत्याही कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या वस्तू, पाहुणे आणि इतर गोष्टी व्यवस्थापित करण्यासाठी स्वतः जबाबदार असतात.