Home /News /career /

"मेहनत खूप करतोय पण यश मिळत नाही"; असं म्हणायची आता वेळच येणार नाही; 'या' टिप्समुळे मिळेल Success

"मेहनत खूप करतोय पण यश मिळत नाही"; असं म्हणायची आता वेळच येणार नाही; 'या' टिप्समुळे मिळेल Success

तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही

तुम्हाला यश मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर तुम्हाला यश मिळण्यापासून (How to be successful in Career) कोणीही थांबवू शकणार नाही.

  मुंबई, 26 जून: एखाद्या क्षेत्रात करिअर (Career) करायचं म्हंटलं आर त्यासाठी त्या क्षेत्रात आवड असणं महत्त्वाचं असतं. मात्र नुसती आवड असून फायदा नाही. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी (Success in Career) स्वतःमध्ये गरजेनुसार आणि वेळेनुसार काही बदल करणं आवश्यक असतं. तसंच काही चांगल्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतात. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या अंमलात आणाल तर तुम्हाला यश मिळण्यापासून (How to be successful in Career) कोणीही थांबवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया. शांत राहा आणि इतरांचं ऐका एखाद्याने त्याच्या शब्दांवर आणि आवाजावर नियंत्रण ठेवले पाहिजे. कारण अनेकवेळा असे घडते की आपण आपल्यासोबत काम करणाऱ्या लोकांवर काही कारणाने ओरडतो. अशा वेळी कठीण परिस्थितीतही रागावर नियंत्रण ठेवून शांत राहायला हवे (Anger Management). देशातील क्षणा-क्षणाच्या बातम्यांची आवड आहे? मग व्हा पत्रकार; कुठे आणि कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर इमोशनल होऊ नका ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात काम करत असली तरी भावनिक बुद्धिमत्तेची नेहमी काळजी घेतली पाहिजे. तुमची अभिव्यक्ती योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे कशी वापरायची हे तुम्हाला माहित असले पाहिजे. निरुपयोगी ठिकाणी आपल्या भावना वाया घालवू नका. वेळेची बचत करा लहानपणापासूनच आपल्याला टाईम मॅनेजमेंटचा धडा शिकवला जातो. पण असे असूनही अनेक लोक वेळेचे योग्य व्यवस्थापन करायला शिकत नाहीत. करिअरमध्ये प्रगती साधण्यासाठी टाइम मॅनेजमेंटची कला जाणून घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. दहावी-बारावीनंतर NDA ची तयारी करायचीय? तर 'इथं' घ्या ॲडनिशन : VIDEO 'नाही' म्हणायला शिका वरिष्ठ असो वा कनिष्ठ, प्रत्येक वेळी प्रत्येकाला हो म्हणण्याची चूक करू नका. कधी कधी गरज असेल तेव्हा नाही म्हणायला शिका. जर तुम्ही नेहमी तुमच्या मर्यादेच्या बाहेर जाऊन प्रत्येक गोष्टीला हो म्हणाल तर लोक तुमचा गैरफायदा घेण्यास सुरुवात करतील.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Success

  पुढील बातम्या