Home /News /career /

देशातील क्षणा-क्षणाच्या बातम्यांची आवड आहे? मग व्हा पत्रकार; कुठे आणि कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर

देशातील क्षणा-क्षणाच्या बातम्यांची आवड आहे? मग व्हा पत्रकार; कुठे आणि कसं घ्याल शिक्षण? इथे मिळेल उत्तर

काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल

काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल

आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges) माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 26 जून: पत्रकारिता (Journalism) म्हंटल की पाळ्या डोळ्यासमोर येतात टीव्हीवर दिसणारे आणि बातम्या सांगणारे अँकर्स (TV Anchors) किंवा कठीण परिस्थितीतही अगदी खरी माहिती आप ल्यापर्यंत पोहोचवणारे रिपोर्टर्स (Journalist reporters). लिखाणाची, कॅमेरा समोर जाण्याची किंवा एखादी घटना लोकांपर्यंत पोहोचवण्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पत्रकारितेत करिअर (Career in journalism) करण्याची इच्छा असते. मात्र पत्रकारिता म्हणजे फक्त अँकरिंग आणि रिपोर्टींगच (Anchoring and Reporting) नाही. याउलट पत्रकारितेत अनेक प्रकारचे कोर्सेस (Courses in Journalism) आहेत ज्यामुळे तुमचं करिअर बनवता येईल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल आणि कॉलेजेसबद्दल (Top journalism colleges) माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. पत्रकारिता हे क्षेत्र जितकं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. सामाजिक भान, सामाजिक बांधिलकी, ज्ञान आणि वेळेचं महत्त्वं असणं आवश्यक आहे. पत्रकारिता . करण्यासठी दहावी त्यानंतर बारावी आणि त्यानंतर मास कम्युनिकेशनमध्ये पदवी घेणं महत्वाचं आहे. किंवा तुम्ही पदवीनंतरही PG डिप्लोमा करू शकता. दहावी-बारावीनंतर NDA ची तयारी करायचीय? तर 'इथं' घ्या ॲडनिशन : VIDEO
    हे आहेत टॉप कॉलेजेस
    भारतीय इंस्टीट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (IIMC) एशियन कालेज ऑफ जर्नलिज्म (ACJ) झेवियर इंस्टीट्यूट ऑफ कम्यूनिकेशन इंडियन इंस्टीट्यूट ऑफ जर्नलिज्म एंड न्यू मीडिया (IIJNM) सिमबायोसिस इंस्टीट्यूट ऑफ मीडिया एंड कम्यूनिकेशन (SIMC) एजेके मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर (AKJMCRC) भारतीय विद्या भवन एमटी स्कूल ऑफ कम्युनिकेशन पूणे युनिवर्सिटी दिल्ली युनिवर्सिटी (DU) जॉब शोधण्यासाठी ना सुरत जावं लागेल ना गुवाहाटी; घरबसल्या मिळेल जॉब; कसा ते वाचा
    हे कोर्सेस कराच
    बी.जे. (Bachelor of Journalism) बीजेएमसी (Bachelor of Journalism and Mass Communication) बीए - जेएमसी (Bachelor of Arts in Journalism and Mass Communication) बीसीजे (Bachelor of Communication and Journalism) बीएमएम (Bachelor of Mass Media) बीजे (Bachelor of Journalism (Honors) बीए (Bachelor of Arts in Mass Communication)
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams

    पुढील बातम्या