जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / एकेकाळी रिसेप्शनिस्ट ते आज IPS अधिकारी, अशी आहे पूजा यादवची UPSC जर्नी

एकेकाळी रिसेप्शनिस्ट ते आज IPS अधिकारी, अशी आहे पूजा यादवची UPSC जर्नी

IPS पूजा यादव

IPS पूजा यादव

एक रिसेप्शनिस्ट तरुणीने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलीये, असं तुम्ही ऐकलंय का?

  • -MIN READ New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : यूपीएससी ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा आहे. ही परिक्षा उत्तीर्ण करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, थोडेच जण यामध्ये उत्तीर्ण होतात. याआधी कुणी रिक्षावाल्याचा मुलगा किंवा शिक्षकाने ही यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे तुम्ही वाचले असेल. मात्र, एक रिसेप्शनिस्ट तरुणीने ही परीक्षा उत्तीर्ण केलीये, असं तुम्ही ऐकलंय का? तर हो हे खरंय. पूजा या रिसेप्शनिस्ट असलेल्या तरुणीने यूपीएससीची परीक्षा पास करत यशाला गवसणी घातली आहे. पूजा यादव असे या आयपीएस तरुणीचे नाव आहे. IPS पूजा यादवचा जन्म 20 सप्टेंबर 1988 रोजी झाला, तिचे बालपण हरियाणामध्ये गेले. पूजा यादवची गणना देशातील सर्वात सुंदर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये केली जाते, ती 2018 च्या बॅचची आयपीएस अधिकारी आहे. या सरकारी नोकरीपूर्वी पूजा यादवने देश-विदेशात अनेक नोकऱ्या केल्या आहेत. IPS पूजा यादवचे सुरुवातीचे शिक्षण हरियाणातून झाले आहे. तिने बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक पदवी घेतली आहे. त्यानंतर ती कॅनडाला गेली. काही वर्षे कॅनडामध्ये काम केल्यानंतर ती जर्मनीला गेली. पण तिला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं होतं आणि म्हणूनच ती तिची परदेशी नोकरी सोडून भारतात आली. भारतात आल्यानंतर पूजा यादवने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतरही त्याने हार मानली नाही. दुप्पट मेहनत घेऊन दुस-या प्रयत्नात ती 174वी रँक मिळवून यशस्वी ठरली.पूजा यादव ही 2018 च्या बॅचची आयपीएस अधिकारी आहे. पूजा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. हेही वाचा -  कुणी IAS तर कुणी IPS, या गावाला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फॅक्टरी का म्हणतात? IPS पूजा यादवला गुजरात केडर मिळाले आहे. पूजासाठी आयपीएस अधिकारी होण्याचा मार्ग सोपा नव्हता. पूजाच्या कुटुंबीयांनी तिला नेहमीच पाठिंबा दिला. पण ते आर्थिकदृष्ट्या कमकुवत होते. एमटेकचे शिक्षण घेत असताना आणि यूपीएससी परीक्षेची तयारी करत असताना, तिने मुलांना शिकवणी दिली आणि तिचा खर्च भागवण्यासाठी रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले. IPS पूजा यादवने 2016 च्या बॅचचे IAS अधिकारी विकास भारद्वाज यांच्याशी 2021 मध्ये लग्न केले. ते केरळ कॅडरचे अधिकारी आहेत. पण पूजासोबत लग्न केल्यानंतर त्यांनी गुजरात केडरमध्ये बदलीची विनंती केली आहे. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये दोघांची भेट झाली. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात