Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, नक्की कशी होणार पुढच्या वर्षीची CBSE परीक्षा? कसा असेल पॅटर्न आणि Syllabus? जाणून घ्या संपूर्ण माहिती

विद्यार्थ्यांनो, नक्की कशी होणार पुढच्या वर्षीची CBSE परीक्षा? कसा असेल पॅटर्न आणि Syllabus? जाणून घ्या संपूर्ण माहिती

परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी Tips

परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी Tips

CBSE Exam याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

    मुंबई, 22 एप्रिल: कोरोनामुळे मागील वर्षी CBSE बोर्डाच्या परीक्षा (CBSE Board Exams) रद्द करण्यात आल्या होत्या. म्हणूनच या शैक्षणिक वर्षात CBSE ना बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (CBSE 10th 12th Exams 2022) दोन सत्रांमध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी टर्म 1 (CBSE Term 1 Exam) ची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकालही लावण्यात आला होता. आता CBSE बोर्डाच्या परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजे CBSE Term 2 परीक्षा ही येत्या काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. यंदा दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्यात आल्यामुळे यापुढेही अशाच पॅटर्नमध्ये परीक्षा (CBSE exam pattern next year) होणार की पुन्हा एकच परीक्षा (How CBSE Exam will held next year) होणार याबाबत अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रश्न पडले होते. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. CBSE Exam Tips: पेपर कोणताही असो नक्की कसं लिहावं प्रश्नाचं Perfect उत्तर; वाचा कशा पद्धतीनं होणार परीक्षा कोरोना महामारीपूर्वी `सीबीएसई`ने बोर्ड परीक्षांची दोन भागांमध्ये विभागणी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टर्मच्या बोर्ड परीक्षा मागील वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आल्या. दुसऱ्या टर्मची परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होत आहे. मात्र CBSE च्या म्हणण्यानुसार, दोन टर्म परीक्षांचं स्वरूप कायम राहील हे CBSE ने कधीही जाहीर केलं नव्हतं, त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं पुढील शैक्षणिक वर्षापासून सिंगल मोड एक्झाम अर्थात एकदाच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा एकदाच आयोजित केल्या जाणार आहेत. कसा असेल Syllabus CBSE ने गेल्या दोन वर्षांत स्वीकारलेलं धोरण कायम राहील. अभ्यासक्रम 30 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. शाळा सध्याची पुस्तकं वापरून कमी केलेला अभ्यासक्रम शिकवू शकतात. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (National Education Policy) सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात दोन वेळा बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी प्रस्तावित आहे. त्यात एक मुख्य परीक्षेसाठी आणि एका सुधारणेसाठीच्या परीक्षेचा समावेश आहे. परंतु, इयत्ता 10 वी आणि 12 वीसाठी बोर्ड परीक्षा कायम राहील. तसंच सीबीएसई अभ्यासक्रमाबाबत बोलताना सीबीएसई बोर्डानेही यापुढे अभ्यासक्रम वाढवण्यावर भर दिला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या CBSE बोर्डाच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात आली आहे, जी यापुढेही सुरू राहण्याची अपेक्षा आहे. टाय ब्रेकर सिस्टम नक्की आहे काय? ज्या पद्धतीनं NEET, JEE मध्ये ठरेल Topper हे होतील प्रयत्न एनईपी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020नुसार, कोचिंग क्लासेस सुरू करण्याची गरज दूर करण्यासाठी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या सध्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यमापन प्रणालीच्या या हानिकारक परिणामांवर मात करण्यासाठी आणि विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी बोर्ड परीक्षांची पुनर्रचना केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, CBSE 10th, CBSE 12th, Education, Exam Fever 2022, ICSE, Job

    पुढील बातम्या