मराठी बातम्या /बातम्या /करिअर /New Jobs | नोव्हेंबर महिन्यात वाढलं नोकरभरतीचं प्रमाण! वाचा कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी

New Jobs | नोव्हेंबर महिन्यात वाढलं नोकरभरतीचं प्रमाण! वाचा कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी

इंडिया स्किल रिपोर्ट 2022मधील माहिती जाणून घ्या

इंडिया स्किल रिपोर्ट 2022मधील माहिती जाणून घ्या

कोरोना महामारीमुळे (corona pandemic) अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले होते. मात्र, आता कोविड संसर्ग नियंत्रणात येत असल्याने पुन्हा एकदा नोकरभरतीचं प्रमाण वाढलं आहे. चला जाणून घेऊ कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक संधी निर्माण झाल्या आहेत.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 3 डिसेंबर : गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम झाला. परिणामी अनेकांना आपल्या नोकऱ्या (Jobs) किंवा रोजगार गमवावे लागले. परंतु, त्यानंतर नोकरभरतीच्या अनुषंगानं नोव्हेंबर 2021 हा महिना काहीसा सकारात्मक ठरल्याचं दिसून आलं. नोव्हेंबर महिन्यात नोकरीविषयक घडामोडींमध्ये (Hiring Activity) गत वर्षीच्या तुलनेत 26 टक्के वाढ नोंदवली गेली आहे, अशी माहिती नोकरी जॉब्जस्पीक इंडेक्समधून स्पष्ट झाली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या क्षेत्रात अधिका मागणी आहे.

    या अहवालानुसार, रिटेल क्षेत्रात (Retail Sector) वाढती मागणी आहे, सणासुदीच्या काळात नागरिक खरेदीसाठी घराबाहेर पडल्यामुळे आणि शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू झाल्यामुळे नोव्हेंबरमध्ये नोकरभरतीविषयक घडामोडींमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि शैक्षणिक क्षेत्रात सर्वाधिक भरती झाल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे. नोव्हेंबरमध्ये रिटेल क्षेत्रातली मागणी 47 टक्क्यांनी वाढली. ही मागणी पाहता सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आल्याचे संकेत मिळत आहेत.

    हॉस्पिटॅलिटी (Hospitality) आणि ट्रॅव्हल सेक्टरमध्ये (Travel Sector) गत वर्षीच्या तुलनेत सुमारे 58 टक्के अधिक नोकरभरती झाली. दुसरीकडे शिक्षण क्षेत्रात (Education Sector) सुमारे 54 टक्क्यांपेक्षा अधिक भरती करण्यात आली. Naukri.com चे चीफ बिझनेस ऑफिसर पवन गोयल यांनी सांगितलं, की `महामारीच्या कालावधीत हॉस्पिटॅलिटी आणि रिटेल क्षेत्राला जोरदार फटका बसला. तसंच या दोन्ही क्षेत्रांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला; मात्र, आता या दोन्ही क्षेत्रांतली परिस्थिती वेगानं बदलताना दिसत आहे.`

    सुवर्णसंधी! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 'या' पदांसाठी बंपर Vacancy; 75,000 रुपये मिळणार पगार

    निर्देशकांनुसार, बँकिंग (Banking) आणि वित्तीय सेवा क्षेत्रात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत सुमारे 30 टक्क्यांनी अधिक, तर आयटी आणि सॉफ्टवेअर उद्योगात (Software Industry) सुमारे 50 टक्क्यांनी अधिक नोकरभरती प्रक्रियेविषयी घडामोडी दिसून आल्या. याशिवाय टेलिकॉम आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स (Internet Service Provider) श्रेणीत सुमारे 91 टक्क्यांपेक्षा अधिक घडामोडी दिसून आल्या. मेडिकल, हेल्थकेअर आणि एफएमजीसी (FMGC) क्षेत्रांत केवळ 3 ते 6 टक्केच घडामोडी दिसून आल्या.

    निर्देशाकांनुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये नोकरभरतीविषयी सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. मेट्रो शहरांमध्ये (Metro Cities) नोकरभरती प्रक्रियेविषयीच्या घडामोडींमध्ये गत वर्षीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं. तसंच टियर-2 शहरांमध्ये ही वाढ सुमारे 16 टक्क्यांपर्यंत होती.

    नव्या वेतन कायद्यामुळे कामगारांचं वेतन आणि सुट्ट्यांच्या नियमांत होणार `हे` बदल

    शहरांविषयी बोलायचं झालं तर नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक नोकरभरतीविषयक घडामोडींची नोंद हैद्राबादमध्ये +47 टक्के, पुण्यात +47 टक्के आणि बेंगळुरूमध्ये +49 टक्के झाली. त्यानंतर मुंबईत +36 टक्के, दिल्ली+एनसीआरमध्ये +34 टक्के, चेन्नईत +35 टक्के आणि कोलकातामध्ये +23 टक्के नोंद झाली. मेट्रोव्यतिरिक्त अन्य शहरांचा विचार करता अहमदाबादमध्ये +61 टक्के अशी सर्वाधिक नोंद नोव्हेंबर 2021 मध्ये झाल्याचं दिसून आलं. यानंतर कोइमतूरमध्ये हे प्रमाण +28 टक्के होतं.

    First published:

    Tags: Job, Job alert, जॉब