Home /News /career /

क्या बात है! 'या' क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर तुमची लाईफ सेट; प्रत्येक महिन्याला मिळेल लाखो रुपये पगार

क्या बात है! 'या' क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर तुमची लाईफ सेट; प्रत्येक महिन्याला मिळेल लाखो रुपये पगार

दहावीनंतर करिअर टिप्स

दहावीनंतर करिअर टिप्स

जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर या करिअर ऑप्शन्सबद्दल (Highest Salary Career options in India) तुम्ही विचार करू शकता आणि यामध्ये शिक्षण घेऊ शकता.

    मुंबई, 04 जुलै: आजकालच्या काळात जॉब म्हंटलं की भरघोस पगार (High Salary Jobs) अशी उमेदवारांची मागणी असते. मात्र प्रत्येक क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळणे कठीण आहे. जर योग्य करिअर ऑप्शन्स (Career options) निवडले तर हे शक्य आहे. भारतात खाजगी (Private Jobs) आणि सरकारी नोकऱ्यांसाठी (Government Jobs) अनेक पर्याय आहेत, ज्यामध्ये दरमहा लाखो रुपये कमावता येतात (Highest Paying Jobs In India). जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर या करिअर ऑप्शन्सबद्दल (Highest Salary Career options in India) तुम्ही विचार करू शकता आणि यामध्ये शिक्षण घेऊ शकता. ज्यांना फक्त शॉर्टकट किंवा शिफारसींच्या मदतीने पुढे जायचे आहे, त्यांना दीर्घकाळ यश मिळू शकत नाही (How to be Successful). तुम्हाला प्रसिद्धीसोबतच पैसाही कमवायचा असेल तर तुम्हाला मेहनतही करावी लागेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला असे काही करिअर ऑप्शन्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला चांगला जॉब (latest Jobs) मिळू शकतो तसंच चांगल्या पगाराची नोकरीही (High salatry jobs) मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊया काही बेस्ट करिअर ऑप्शन्स. नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) फ्रेशर्सना भारतात सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि फुल स्टॅक डेव्हलपर म्हणूनही चांगला पगार मिळू शकतो. मात्र या क्षेत्रातील पगार देखील तुमच्या कौशल्यांवर आणि कंपनीवर (Software Developer Jobs) अवलंबून असतो. सामान्यत: 3 वर्षांपर्यंतचा अनुभव असलेले नवीन किंवा सॉफ्टवेअर अभियंता दरवर्षी सरासरी 3.6 लाख रुपये कमावतात. इंजिनिअरचे प्रारंभिक पॅकेज 10 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. यासाठी BE/B.Tech मध्ये पदवी असणारे आवश्यक आहे. तसेच कोडिंगचं ज्ञान असणंही आवश्यक आहे. मशीन लर्निंग एक्सपर्ट (Machine Learning Expert) तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काहीतरी मनोरंजक आणि सर्जनशील करायचे असेल, तर मशीन लर्निंग हा एक उत्तम पर्याय असू शकतो. मशीन लर्निंग तज्ञ सुरुवातीला प्रतिवर्षी 5 लाखांपेक्षा जास्त कमावतात आणि अनुभवानुसार वेतनमानही वाढते. या क्षेत्रात जॉब मिळवण्यासाठी गणित/सांख्यिकी विषयातील पदव्युत्तर पदवी आणि किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. डॉक्टर (Doctor) दरवर्षी करोडो विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहतात. हा व्यवसाय भारतातील सर्वाधिक पगाराच्या नोकऱ्यांपैकी एक मानला जातो. सरकारी डॉक्टरांचा पगार खासगी डॉक्टरांपेक्षा कमी असतो. खासगी डॉक्टरांना वर्षाला ३० ते ५० लाख रुपये, तर सरकारी डॉक्टरांना ४ लाख ते १२ लाख रुपये पगार मिळतो. त्याच वेळी, हृदयरोगतज्ज्ञ किंवा ऑर्थोपेडिक सर्जनला दरवर्षी 18 लाख रुपये मिळू शकतात. डॉक्टर होण्यासाठी बारावीनंतर NEET परीक्षा द्यावी लागते. यानंतर M.B.B.S, M.D पर्यंत शिक्षण घेऊन क्लिनिक सुरु करता येते.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job

    पुढील बातम्या