जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / अरे बापरे! वयाच्या 11 व्या वर्षी फिजिक्स विषयात ग्रॅज्युएट; Future Planning वाचून थक्क व्हाल

अरे बापरे! वयाच्या 11 व्या वर्षी फिजिक्स विषयात ग्रॅज्युएट; Future Planning वाचून थक्क व्हाल

अरे बापरे! वयाच्या 11 व्या वर्षी फिजिक्स विषयात ग्रॅज्युएट; Future Planning वाचून थक्क व्हाल

वयाच्या चौथ्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला आणि वयाच्या आठव्या वर्षीपर्यंत त्याने त्याचे हायस्कुलचे शिक्षण पूर्णही केले होते.

    नवी दिल्ली, 8 जुलै : भारतीय शिक्षण पद्धतीत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन असे टप्पे असतात. आपण असंच शिक्षण घेतलं असेल. आपल्याकडेही काही अतिशय बुद्धिमान मुलांना पुढच्या इयत्तेची परीक्षा देण्याची परवानगी दिली जाते. पण बेल्जियममधील लॉरेंट सिमेन्स (Laurent Simons) नावाच्या एका लहान मुलाने केवळ 11 व्या वर्षी ग्रॅज्युएशनचे शिक्षण पूर्ण केले आहे. अँटव्हर्प (Antwerp) युनिव्हर्सिटीमधून त्याने फिजिक्स विषयात पदवी मिळवली आहे. ही खूपच आश्चर्यकारक गोष्ट असून जागतिक स्तरावर त्याची चर्चा सुरू आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तो शाळेत जाऊ लागला आणि वयाच्या आठव्या वर्षीपर्यंत त्याने त्याचे हायस्कुलचे शिक्षण पूर्णही केले होते. सर्वसामान्य मुलं ग्रॅज्युएशनपर्यंतचे शिक्षण पूर्ण करेपर्यंत 20 ते 22 वर्षांची होतात तर काहीजण पंचविशीदेखील गाठतात. त्यात, ग्रॅज्युएशनचा कोर्स हा 3 किंवा 4 वर्षांचा असतो. पण या मुलाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हे सगळे ठोकताळे मोडीत काढले आहेत. लॉरेंटचा आयक्यु म्हणजे बुद्ध्यांक 145 असून त्याची तुलना महान शास्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein ) आणि स्टीफन हॉकिंग्ज यांच्याशी (Stephen Hawking) केली जात आहे. हे ही वाचा- नक्षलग्रस्त जिल्ह्यात राहून IASहोण्याचं स्वप्न बघणाऱ्या नम्रता जैन यांची यशोगाथा याविषयी माहिती देताना, लॉरेंट म्हणाला, “मला माझ्या वयाची पर्वा नाही. मला फक्त जास्तीत जास्त ज्ञान प्राप्त करायचं आहे. मला मनुष्याला या पृथ्वीतलावरील सर्वात बुध्दिमान आणि श्रेष्ठ प्राणी बनवायचं आहे. मी मनुष्याच्या शरीरातील विविध अवयवांना यंत्रात रुपांतरित करायचं आहे. माझ्या डोक्यात त्याबद्दल एक योजनाही आकार घेत आहे. हे कठीण आहे याची मला जाणीव आहे. क्वांटम फिजिक्समध्ये मी अणू-रेणूंसारख्या सूक्ष्म कणांचाही अभ्यास केला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट प्रोफेसर्ससोबत मला काम करायचं आहे.” लहान वयात ग्रॅज्युएशनची डिग्री संपादित करणारी लॉरेंट ही जगातील दुसरी व्यक्ती आहे. याआधीही अक्षय व्यंकटेश(Akshay Venkatesh), एरिक डिमेन (Erik Demaine), चार्लस होमेर हास्किन(Charles Homer Haskins), ज्युलिएट बेनी(Juliet Beni), शो यानो (Sho Yano), नॉर्बर्ट विनर (Norbert Wiener),रुथ लॉरेन्स(Ruth Lawrence ), बालमुरली अंबाती (Balamurali Ambati), किम युंग-याँग(Kim Ung-Yong) यांसारख्या अनेक लहान मुलांनी खेळण्या बागडण्याच्या वयातच वेगवेगळ्या क्षेत्रांत विविध प्रकारे उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. या मुलांना योग्य संधी मिळाली तर ते आपल्या बुद्धिमत्तेची आणखी चमक दाखवू शकतात. त्यांची क्षमता जबरदस्त असल्याने आपल्या आकलनशक्ती आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ते अभ्यासात खूप पुढे जातात. त्यांच्या या प्रयत्नांना त्यांच्या आईवडिलांची साथ मिळणंही गरजेचं असतं. लॉरेंटला ती साथ मिळाली तर नक्कीच तो जगात नाव काढेल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात