जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / GMC Aurangabad Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे 123 जागांसाठी भरती; असं करा अप्लाय

GMC Aurangabad Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे 123 जागांसाठी भरती; असं करा अप्लाय

GMC Aurangabad Recruitment: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद इथे 123 जागांसाठी भरती; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

औरंगाबाद, 19 सप्टेंबर:  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College and Hospital Aurangabad) आणि रुग्णालय औरंगाबाद इथे तब्बल 123 जागांसाठी लवकरच बंपर भरती (GMC Aurangabad Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना (gmc aurangabad vacancy) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Aurangabad Latest Jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - एकूण जागा 123 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - या पदभरतीसाठी रोटरी इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केलेले MBBS उमेदवार पात्र असणार आहेत. तसंच उमेदवारांकडे MMC /MCI ची कायमची नोंदणी असणं आवश्यक आहे. GMC Aurangabad Recruitment 2021

GMC Aurangabad Recruitment 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद. निवड प्रक्रिया निवड फक्त MBBS पात्रतेवर आधारित असेल. PG ला प्राधान्य दिलं जाणार नाही. निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती तात्पुरत्या आधारावर 5 महिन्यांच्या कालावधीसाठी केली जाईल. यासाठी मेरिट लिस्ट काढण्यात येईल. MBBS (ग्रँड टोटल) च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. MBBS फायनल इअरच्या प्रत्येक अटेम्प्टसाठी पाच मार्क्स वजा केले जातील. या आधारे मेरिट लिस्ट काढण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. हे वाचा -   मातोश्री लक्ष्मी शुगर को-जनरेशन इंडस्ट्रीज लिमिटेड सोलापूर इथे भरती ही कागदपत्रं आवश्यक जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र ओळखपत्र MBBS शैक्षणिक प्रमाणपत्र मागासवर्गीय उमेदवार असल्यास जातीचा दाखला असणं आवश्यक. इंटरशिप सर्टिफिकेट. Bond सर्व्हिसचा दाखला आणि प्रमाणपत्र. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 24 सप्टेंबर 2021 हे वाचा -  PMC Recruitment: पुणे महानगरपालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती; लगेच करा अर्ज

JOB TITLE  GMC Aurangabad Recruitment 2021
या पदांसाठी भरती  कनिष्ठ रहिवासी (Junior Resident)
एकूण जागा 123
शैक्षणिक पात्रता रोटरी इंटर्नशिप प्रोग्राम पूर्ण केलेले MBBS उमेदवार पात्र
निवड प्रक्रिया  यासाठी मेरिट लिस्ट काढण्यात येईल. MBBS (ग्रँड टोटल) च्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
ही कागदपत्रं आवश्यक  जन्मतारखेचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र ओळखपत्र MBBS शैक्षणिक प्रमाणपत्र मागासवर्गीय उमेदवार असल्यास जातीचा दाखला असणं आवश्यक. इंटरशिप सर्टिफिकेट. Bond सर्व्हिसचा दाखला आणि प्रमाणपत्र.
शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://aurangabad.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात