• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Government Jobs : येथे इंजिनिअरसह अनेक पदांच्या भरती, जाणून घ्या सविस्तर

Government Jobs : येथे इंजिनिअरसह अनेक पदांच्या भरती, जाणून घ्या सविस्तर

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचा (Corona) कहर पाहायला मिळाला. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध भागांमध्ये लॉकडाउन किंवा कडक निर्बंध लागू केले गेले. या सर्व स्थितीचा सर्वच क्षेत्रांवर दुष्परिणाम दिसून आला. कोरोना स्थितीमुळे अनेकांना रोजगार किंवा नोकरी (Jobs) गमवावी लागली. त्यामुळे साहजिकच नोकरीच्या शोधात असलेल्यांची संख्या वाढली आहे. यात नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांची भर पडत आहे. एकीकडे बेरोजगारी वाढत असताना नवी नोकरी किंवा रोजगार शोधण्याचं मोठं आव्हान अनेक युवकांसमोर आहे. त्यात सरकारी नोकरी (Sarkari Naukri) हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक युवक कठोर परिश्रम करतात. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे. कारण नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडनं (NFL) 183 पदांच्या भरतीसाठी आधिसूचना जारी केली आहे. या पदांच्या भरतीसाठी (Recruitment) आता अर्ज मागवण्यात आले आहेत. ही अर्ज प्रक्रिया आजपासून (21 ऑक्टोबर 2021) सुरू झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन (Online) पध्दतीनं अर्ज भरू शकतात. पदांकरिता अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. या पदभरती प्रक्रियेमुळं निश्चितच सरकारी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. हे ही वाचा-वयाच्या 12 व्या वर्षापासून Crypto मध्ये गुंतवणूक; 18 व्या वर्षी झाला कोट्यवधी असा करा अर्ज नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडच्या या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी nationalfertilizers.com या अधिकृत वेबसाईटवर जात अर्ज दाखल करावेत. अर्ज भरण्याकरिता उमेदवारांना या वेबसाइटवर गेल्यावर मुख्य पेजवर उपलब्ध असलेल्या करिअर ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर `रिक्रुटमेंट इन एनएफएल` या सेक्शनवर क्लिक करावं. येथून उमेदवारांना `रिक्रुटमेंट ऑफ नॉन- एक्झिक्युटिव्ह (वर्कर्स) इन मार्केटिंग, ट्रान्सपोर्टेशन अण्ड व्हेरियस टेक्निकल डिसीप्लिन्स -2021` या लिंकवर जावे लागेल. त्यानंतर स्क्रिनवर अॅप्लिकेशन पेज ओपन होईल. अशी आहे पदभरती - ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट – 87 पदं. - ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट – 15 पदं. - ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट – 7 पदं. - लोको अटेंडेंट – 4 पदं. - लोको अटेंडेंट – 19 पदं. - अटेंडेंट ग्रेड – 1 – 17 पदं - अटेंडेंट ग्रेड – 1 (इलेक्ट्रिकल) – 19 पदं. - मार्केटिंग रिप्रेझेंटेटिव्ह – 15 पदं. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडनं वरील पदांच्या भरतीकरिता अर्ज स्वीकारणं सुरू केलं असून, अर्ज करण्यासाठी 10 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. पदांसाठी निकष, भरतीप्रक्रियेची सविस्तर माहिती घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे.

  First published: