मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Government Jobs: नाशिकमधील चलनी नोटांच्या प्रेसमध्ये तब्बल 149 जागांसाठी भरती; कोणाला मिळणार नोकरी? वाचा

Government Jobs: नाशिकमधील चलनी नोटांच्या प्रेसमध्ये तब्बल 149 जागांसाठी भरती; कोणाला मिळणार नोकरी? वाचा

चलन नोट प्रेस नाशिक भरती

चलन नोट प्रेस नाशिक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 04 जानेवारी : चलन नोट प्रेस नाशिक (Currency Note Press Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (CNP Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कल्याण अधिकारी, पर्यवेक्षक, सचिवीय सहाय्यक, कनिष्ठ कार्यालय सहाय्यक, कनिष्ठ तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

कल्याण अधिकारी (Welfare Officer)

पर्यवेक्षक (Supervisor)

सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant)

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant)

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)

नोकरीची संधी सोडू नका! MMRDA मध्ये तब्बल 2 लाख रुपये पगाराचा Job; लगेच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कल्याण अधिकारी (Welfare Officer) - उमेदवारांनी सामाजिक शास्त्रातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

पर्यवेक्षक (Supervisor) - उमेदवारांनी फर्स्ट क्लासमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (मुद्रण) / B.Tech./ B.E./B.Sc/ पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे

सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant) - उमेदवारांनी किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीघेतली असणं आवश्यक आहे. संगणक ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी 80 wpm आणि इंग्रजी किंवा हिंदी 40 wpm मध्ये स्टेनोग्राफी केली असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - उमेदवारांनी किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीघेतली असणं आवश्यक आहे. संगणक ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी 40 wpm आणि इंग्रजी किंवा हिंदी 30 wpm मध्ये स्टेनोग्राफी केली असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

कल्याण अधिकारी (Welfare Officer) - 29,740/- - 1,03,000/- रुपये प्रतिमहिना

पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना

सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant) - 23,910/- – 85,570/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - .21,540 /- - 77,160/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

10th Pass Jobs: देशातील 'या' मोठ्या बँकेत दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची मोठी संधी; अशी होणार निवड

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 जानेवारी 2022

JOB TITLECNP Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीकल्याण अधिकारी (Welfare Officer) पर्यवेक्षक (Supervisor) सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant) कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवकल्याण अधिकारी (Welfare Officer) - उमेदवारांनी सामाजिक शास्त्रातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे. पर्यवेक्षक (Supervisor) - उमेदवारांनी फर्स्ट क्लासमध्ये पूर्णवेळ अभियांत्रिकी डिप्लोमा (मुद्रण) / B.Tech./ B.E./B.Sc/ पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant) - उमेदवारांनी किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीघेतली असणं आवश्यक आहे. संगणक ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी 80 wpm आणि इंग्रजी किंवा हिंदी 40 wpm मध्ये स्टेनोग्राफी केली असणं आवश्यक आहे. कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - उमेदवारांनी किमान 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीघेतली असणं आवश्यक आहे. संगणक ज्ञान, इंग्रजी किंवा हिंदी 40 wpm आणि इंग्रजी किंवा हिंदी 30 wpm मध्ये स्टेनोग्राफी केली असणं आवश्यक आहे. कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकल्याण अधिकारी (Welfare Officer) - 29,740/- - 1,03,000/- रुपये प्रतिमहिना पर्यवेक्षक (Supervisor) - 27,600/- - 95,910/- रुपये प्रतिमहिना सचिवीय सहाय्यक (Secretarial Assistant) - 23,910/- – 85,570/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (Junior Office Assistant) - .21,540 /- - 77,160/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) - 18,780/- - 67,390/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख25 जानेवारी 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/cnpspmcdec21/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Central government, Nashik, जॉब