मराठी बातम्या /बातम्या /करिअर /सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; 12 वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, पाहा डिटेल्स

सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; 12 वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, पाहा डिटेल्स

ऑइल इंडियाच्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ सहाय्यक पद भरती 2021 साठी 15 ऑगस्टपर्यंत कंपनीच्या ऑइल इंडिया डॉट कॉम (Oil India.com) या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.

    नवी दिल्ली, 6 जुलै: कोरोनाच्या काळात अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असताना नवीन नोकऱ्या मिळणंही कठीण होत आहे. अशावेळी सरकारी पातळीवर राबवण्यात येत असलेल्या नोकरभरती मोहिमेमुळे आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. सध्या पदवीधर नसलेल्या तरुणांसाठीदेखील एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची कंपनी ऑईल इंडिया लिमिटेडने (Oil India) कनिष्ठ सहाय्यक (लिपिक-कम-कॉम्प्युटर ऑपरेटर-Clark cum Computer Operator) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी केली आहे. त्याअंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदासाठी 120 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे.

    ऑइल इंडियाच्या अधिसूचनेनुसार, कनिष्ठ सहाय्यक पद भरती 2021 साठी 15 ऑगस्टपर्यंत कंपनीच्या ऑइल इंडिया डॉट कॉम (Oil India.com) या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात.

    रिक्त जागा -

    एकूण जागा - 120

    एससी (SC) - 08

    एसटी (ST) - 14

    ओबीसी (OBC) - 32

    ईडब्ल्यूएस (EWS)-12

    अनारक्षित वर्ग - 54

    वयोमर्यादा -

    ओपन - किमान 18 वर्षे आणि कमाल 30 वर्षे

    एससी आणि एसटी - किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे

    ओबीसी - किमान 18 वर्षे आणि कमाल 33 वर्षे

    शैक्षणिक पात्रता -

    कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 40 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण असावं लागणार आहे. त्यासह किमान सहा महिन्यांचा कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स केलेला असणं आवश्यक आहे.

    (वाचा - Educational Documents हरवले? आता नो टेन्शन, एका क्लिकवर मिळणार नवी कागदपत्रं)

    निवड प्रक्रिया -

    कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच संगणकीय चाचणीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कमीतकमी 50 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. मात्र अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट 40 टक्के आहे.

    सीबीटी अर्थात कॉम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये एकूण तीन भाग आहेत. इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान (English Language and GK), रिझनिंग, गणित (Maths), संख्यात्मक आणि मानसिक क्षमता, तांत्रिक ज्ञान (Technical Knowledge) अशा विषयांचा यात समावेश असतो. इंग्रजी भाषा आणि सामान्य ज्ञान हा एक भाग असतो, तर रिझनिंग, गणित, आणि मानसिक क्षमता हा एक विभाग असतो.

    (वाचा - भारत पेट्रोलियममध्ये इंजिनीअर आणि डिप्लोमा धारकांसाठी नोकरीची संधी)

    या दोन्ही विभागात प्रत्येकी 20 टक्के प्रश्न येतात तर 60 टक्के प्रश्न तांत्रिक ज्ञानावर अर्थात टेक्निकल नॉलेजवर आधारीत असतात. एमसीक्यू म्हणजे मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स पद्धतीने ही परीक्षा होते. यात निगेटीव्ह मार्किंग नसतं. इंग्लिश आणि उमेदवाराची प्रादेशिक भाषा अशा दोन्ही भाषेत हे प्रश्न उपलब्ध असतात.

    अधिक माहितीसाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचा. नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

    First published:
    top videos

      Tags: Job, Job alert