मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Government Internship: उमेदवारांनो, FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी; हा चान्स अजिबात सोडू नका

Government Internship: उमेदवारांनो, FSSAI मध्ये इंटर्नशिपची मोठी सुवर्णसंधी; हा चान्स अजिबात सोडू नका

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण इंटर्नशिप

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण इंटर्नशिप

या इंटर्नशिपसाठी अप्लाय (How to apply for FSSAI Internship) कसं करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 07 डिसेंबर: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India Internship 2022) इथे लवकरच उमेदवारांना इंटर्नशिपची (FSSAI Internship Scheme 2022) संधी उपलब्ध होणार आहे. FSSAI इंटर्नशिप प्रोग्राम फूड रेग्युलेशनच्या आणि अन्न सुरक्षा प्रशासन अशा विविध क्षेत्रात इंटर्नला (Government Internship Program) नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे उमेदवारांसाठी ही सरकारी कार्यलयात इंटर्नशिपची (Central government Internship Program) सुवर्णसंधी असणार आहे. या इंटर्नशिपसाठी अप्लाय (How to apply for FSSAI Internship) कसं करणार याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया याबद्दलच्या डिटेल्स.

अशी असेल पात्रता  

भारतातील/विदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पुढील शिक्षण घेत असलेले उमेदवार या इंटर्नशिप प्रोग्रामसाठी पात्र असणार आहेत.

रसायनशास्त्र किंवा जैवरसायनशास्त्र किंवा अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा अन्न आणि पोषण किंवा खाद्यतेल तंत्रज्ञान किंवा सूक्ष्मजीवशास्त्र किंवा डेअरी तंत्रज्ञान किंवा कृषी किंवा बागायती विज्ञान किंवा औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र किंवा विषशास्त्र किंवा सार्वजनिक आरोग्य किंवा जीवन विज्ञान किंवा जैवतंत्रज्ञान किंवा फळ आणि भाजी तंत्रज्ञान किंवा अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी.यामध्ये पदव्युत्तर पदवी अथवा B.Tech/BE मध्ये शिक्षण घेत असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत.

PG डिप्लोमा/पत्रकारिता, जनसंपर्क आणि जनसंपर्क अधिकारी पदवी असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी मिळणार आहे.

बी.ई. / बी. टेक संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर अभियांत्रिकी किंवा संबंधितब्रांचमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.

सार्वजनिक धोरण सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा किंवा बॅचलर/मास्टर ऑफ लॉमध्ये शिक्षण घेत असलेल्या उमेदवारांनाही इंटर्नशिपची संधी देण्यात येणार आहे.

फूड टेक्नॉलॉजी किंवा संबंधित विषयातील बॅचलर प्रोग्रामच्या 3ऱ्या / 4थ्या वर्षातील विद्यार्थीही अप्लाय करू शकणार आहेत.

नोकरदारांना संधी! मुंबईसह या शहरांतील कंपन्या देतायेत मोठी पगारवाढ

इंटर्नशिपचा कालावधी

इंटर्नशिप संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल, इंटर्नशिप 03 महिन्यांपर्यंतच्या कालावधीसाठी ऑफर केली जाईल, जी जास्तीत जास्त 06 महिन्यांपर्यंत वाढविली जाऊ शकते. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीची इंटर्नशिप दिली जाणार नाही.

कुठे असणार इंटर्नशिप

ही इंटर्नशिप संपूर्ण देशभरातील कार्यालयांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबईस्थित ऑफिसचाही समावेश आहे. FSSAI (पश्चिम क्षेत्र), हॉल मार्क बिझनेस प्लाझा, संत ज्ञानेश्वर मार्ग, समोर. गुरुनानक हॉस्पिटल रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 या पत्त्यावर ही इंटरशीप होणार आहे.

अशा पद्धतीनं करा अप्लाय

इच्छुक आणि पात्र विद्यार्थी निर्दिष्ट नमुन्यानुसार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

अंतिम निवडीसाठी निवडलेल्या उमेदवारांना एक लहान लेखन / सादरीकरण सबमिट करणे आवश्यक असू शकते.

निवडलेल्या उमेदवारांची अंतिम यादी त्यांच्या प्रवेशाच्या तारखेसह आणि इंटर्नशिप कार्यकाळ FSSAI वेबसाइटवर ऑनलाइन घोषित केला जाईल.

Job Tips: सर्व ठिकाणी Resume सेंड करूनही मिळत नाहीये नोकरी? मग 'या' चुका टाळा

इतका मिळणार Stipend

या इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 10,000/- रुपये प्रतिमहिना Stipend दिला जाणार आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://fssai.gov.in/internship/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: