जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / स्पाईसजेटचा डबल धमाका! वैमानिकांचे वाढवले पगार आणि ग्राहकांना दिल्या बेस्ट ऑफर्स

स्पाईसजेटचा डबल धमाका! वैमानिकांचे वाढवले पगार आणि ग्राहकांना दिल्या बेस्ट ऑफर्स

स्पाईस जेट

स्पाईस जेट

बजेट एअरलाइन सर्व्हिस देणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने पायलट्सच्या (कॅप्टन) पगारात मोठी वाढ केली आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : एकीकडे गो फर्स्टसारखी एअरलाइन कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे, तर दुसरीकडे स्पाइसजेटने मात्र आपल्या प्रवाशांसाठी व पायलट्ससाठी अनेक नवीन ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर्ससाठी कंपनी मोठी रक्कम खर्च करणार आहे. बजेट एअरलाइन सर्व्हिस देणाऱ्या स्पाइसजेट विमान कंपनीने पायलट्सच्या (कॅप्टन) पगारात मोठी वाढ केली आहे. आता 75 तासांच्या उड्डाणासाठी पायलट्सचा पगार दरमहा 7.5 लाख रुपये करण्यात आल्याचं एअरलाइनच्या वतीने सांगण्यात आलं आहे. नवीन वेतन 16 मे 2023 पासून लागू झालं आहे. या पूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये, विमान कंपनीने 80 तासांच्या उड्डाणासाठी वैमानिकांचं मासिक वेतन 7 लाख रुपये केलं होतं. या शिवाय त्यांनी प्रवाश्यांसाठीही काही ऑफर्स आणल्या आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.

    कोचिंग नव्हे तर Self Study ने UPSC मध्ये मारली बाजी, लोको पायलटच्या मुलाची कमाल!

    75 तासांच्या उड्डाणासाठी 7.5 लाख रुपये पगार एअर लाइनने पायलट पोस्टशी संबंधित एका पुरस्काराची घोषणाही केली आहे. ट्रेनी व फर्स्ट ऑफिसर्सच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. एअरलाइनने प्रसिद्ध केलेल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे की, 75 तासांच्या उड्डाणासाठी पायलट्सचं मासिक वेतन 7.5 लाख रुपये करण्यात येत आहे. एअरलाइनने त्यांच्या पायलट्ससाठी दर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंतचे मासिक लॉयल्टी पुरस्कार जाहीर केले आहेत. हे त्यांच्या मासिक पगाराच्या व्यतिरिक्त असतील.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स स्पाइसजेटने 18 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणल्या आहेत. या ऑफर अंतर्गत, प्रवाशांना फक्त 1818 रुपयांमध्ये फ्लाइट बुक करण्याची संधी मिळत आहे. विमान कंपनीने रेग्युलर पॅसेंजर्ससाठी ही खास ऑफर आणली आहे. एअरलाइनने वन-वे डोमेस्टिक फेअर स्पेशल सेलची घोषणा केली आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ बेंगळुरू-गोवा आणि मुंबई-गोवा मार्गांवर घेऊ शकता. यासाठी तुम्ही 23 ते 28 मेदरम्यान तिकीट बुक करू शकता.

    PHOTOS: UPSC च्या टॉप-5 मध्ये येणारा एकमेव मुलगा कोण आहे? IAS व्हायचं नव्हत, पण..

    स्पाइसजेटच्या एम-साइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करताना प्रवासी अतिरिक्त फायदे मिळवू शकतात. 2023 मध्ये वयाची 18 वर्षं पूर्ण केलेल्या किंवा वयाने 18 वर्षांचे असणाऱ्या प्रवाश्यांना स्पाइसजेट 3,000 रुपयांचं मोफत फ्लाइट व्हाउचर देणार आहे. या मेगा सेलमध्ये प्रवासी त्यांची आवडत्या सीट फ्लॅट 18 रुपयांमध्ये बुक करू शकतात. तसंच SpiceMax कडूनही 50% सूट मिळू शकते.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात