हैदराबाद, 26 नोव्हेंबर: सध्या जगभरात IT क्षेत्रातील कंपन्या उमेदवारांवर रोजगाराच्या संधींचा आणि जॉब्सचा (IT Jobs in India)अक्षरशः पाऊस पाडत आहेत. त्यात भारतात इंजीनिअर्स आणि टॅलेंटची कमतरता नसल्यामुळे भारतातीलच नाही तर जगभरातील IT कंपन्या (Jobs for IT engineers in India) भारतात येऊन उमेदवारांना जॉब्स देत आहेत. अशीच एक अमेरिकेची Global tech company UST हे भारतातील (UST company Jobs in Banglore) काही महत्त्वाच्या शहरांमध्ये तब्बल 7,000 प्रोफेशन्सलना (IT professionals Jobs in UST company) नोकरीची संधी देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कंपनीचा प्लॅन नक्की आहे काय?
जागतिक तंत्रज्ञान कंपनी UST ची बँगलोर केंद्रातील कर्मचारी संख्या 2023 पर्यंत 6,000 वरून 12,000 पर्यंत दुप्पट करण्याची योजना आहे. कंपनीने फेब्रुवारी 2020 पासून 2000 हून अधिक कर्मचारी जोडले आहेत. टेक कंपनी सर्वोत्तम प्रतिभांना आकर्षित करण्यासाठी भारतात आपली स्थानिक उपस्थिती वाढवण्याची योजना आखत आहे. यासंबंधीचं वृत्त लाईव्हमिंटनं दिलं आहे.
“पुढील 18-24 महिन्यांत, बेंगळुरू केंद्र (Banglore jobs) हेल्थकेअर, तंत्रज्ञान (Technology), लॉजिस्टिक (Logistic), सेमीकंडक्टर्स आणि BFSI या विभागांसाठी भरती करणार आहे" असं कंपनीनं निवेदनात म्हंटलं आहे.
Special Story: कोणत्या बँकेचं Education Loan तुमच्यासाठी सर्वांत योग्य? वाचा
तसंच UST हैदराबादने नुकतेच 1000 कर्मचारी सामील झाल्याचा आनंद साजरा केला आणि पुढील दोन वर्षांत केंद्रातील मुख्य संख्या दुप्पट करून 2000 कर्मचार्यांपर्यंत पोहोचवण्याची आपली योजना जाहीर केली. त्यांउळे भारतीय उमेदवारांसाठी ही मोठी आनंदाचो गोष्ट आहे. अनेक उमेदवारांना यामुळे जॉब्सचो संधी मिळणार आहे.
" बेंगळुरू येथे कंपनीच्या जगातील सर्वात मोठ्या केंद्रांपैकी एक असलेल्या आमच्या भारतातील कामकाजाचा विस्तार करण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत. यूएसटीमध्ये, आम्ही उत्कृष्ट प्रतिभावंतांना कामावर घेण्याचा निर्धार केला आहे कारण ते कंपनीला सर्वोत्तम-इन-क्लास डिजिटल क्रांतीचा विस्तार करण्याची आणि आमच्या जागतिक ग्राहकांना बंगळुरूमध्ये आयटी उद्योगात नोकरीच्या उत्तम संधी निर्माण करण्याची संधी प्रदान करतील." असे कंपनीचे भारताचे हेड Alexander Varghese यांनी म्हंटल आहे.
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, सायबर सिक्युरिटी, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, जावा, डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंग, अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट अँड मॉडर्नायझेशन, एआय/एमएल, ऑटोमेशन (एआय/एमएल, ऑटोमेशन) मधील डिजिटल स्किल्स आणि कौशल्यांसह, USTने या वर्षी जगभरात 10,000 हून अधिक नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची आपली योजना जाहीर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, जॉब