नवी दिल्ली 30 ऑगस्ट : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूरने (IIT Kharagpur) ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग अर्थात गेट परीक्षेच्या (GATE- 2022) तारखा जाहीर केल्या आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी (Engineering) आणि विज्ञानामधील (Science) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या या परीक्षेची ऑनलाइन नाव नोंदणी (Online Registration) (आजपासून) 30 ऑगस्ट 2021पासून सुरू होत आहे. फेब्रुवारी 2022मध्ये 5, 6, 12 आणि 13 या तारखांना दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा होणार आहे. परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार आयआयटीमध्ये एमटेक (M. Tech) अभ्यासक्रमासाठी प्रवेशास पात्र असतील. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खरगपूरच्या gate.iitkgp.ac.in या अधिकृत वेबसाइट पोर्टलवर नावनोंदणी करता येणार आहे. नोंदणी विंडोवर 24 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, मात्र वाढीव मुदत 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत आहे. अर्ज फक्त ऑनलाइन (Online Applications Only) सादर करावे लागतील. परीक्षा पद्धत, विषय, अभ्यासक्रम, अर्ज प्रक्रिया इत्यादीबाबत सविस्तर तपशील देणारी माहिती पुस्तिका वेबसाईटवर अपलोड करण्यात आली असून, अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी ती व्यवस्थितपणे वाचणे आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन कॉपीज हाताशी ठेवणं आवश्यक आहे. RRB Group D परीक्षेसंदर्भात अपडेट; अनेक टप्प्यांत परीक्षा होण्याची शक्यता इच्छुक उमेदवार जास्तीत जास्त दोन पेपरसाठी अर्ज करू शकतात, मात्र त्यांना फक्त एकच अर्ज सादर करावा लागेल. अनेक अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसंच खुल्या (Open ) प्रवर्गातील उमेदवारांना 1500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर आरक्षित वर्गासाठी (Reserved Category) 750 रुपये शुल्क असेल. 3 तासांच्या कालावधीची ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. जिओमॅटिक्स इंजिनीअरिंग (जीई) आणि नेव्हल आर्किटेक्चर व मरीन इंजिनीअरिंग (एनएम) असे दोन नवीन विषय यावेळी उपलब्ध करण्यात आले आहेत. पात्रतेचे निकष: अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, आर्किटेक्चर, विज्ञान, वाणिज्य, कला शाखेतील कोणताही सरकारी मान्यताप्राप्त पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला किंवा कोणत्याही पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या किंवा त्या पुढील वर्षात शिकत असलेला उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. मात्र ज्या उमेदवारांनी खासगी व्यावसायिक संस्थांमधून (Private Institutes) अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्या अभ्यासक्रमांना MoE/AICTE/UGC/UPSC द्वारे बी.ई., बी.टेक.,बी आर्च, बी प्लॅनिंगच्या दर्जाची मान्यता दिल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ज्या उमेदवारांनी भारताव्यतिरिक्त इतर देशांमधून (Foreign Countries) पदवी प्राप्त केली आहे किंवा करत आहेत आणि या परीक्षेसाठी नाव नोंदवू इच्छितात ते सध्या तिसऱ्या किंवा त्या पुढील वर्षात शिक्षण घेत असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, वाणिज्य यापैकी कोणत्याही शाखेतील तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. UG कोर्ससाठी परदेशात जाताना या महत्त्वाच्या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष आवश्यक कागदपत्रं : - पदवी किंवा पात्रता परीक्षा प्रमाणपत्र (Graduate or Eligible Exam Certificate) - अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (Passport Size Photo) - आधार कार्ड (Aadhaar Card), पासपोर्ट (Passport), पॅन कार्ड (Pan Card), मतदार कार्ड (Voter Card) किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) यापैकी एक फोटो आयडी - जन्मतारीख (Birthdate), घराचा पत्ता (Home Address) याचा पुरावा - एससी/एसटी प्रमाणपत्र पीडीएफ फाईल (SC/ST Certificate PDF File) - स्वाक्षरीची स्कॅन कॉपी (Scanned Signature) - दहावी, बारावीची गुणपत्रिका (SSC, HSC Marksheet) - अंगठ्याच्या ठशाची स्कॅन कॉपी (Scanned Copy of Thumb Inmpression) यासह कॉलेजचे नाव, पत्ता नाव तसंच उमेदवाराचा ई-मेल आयडी, जन्मतारीख, पत्ता इत्यादी माहिती देणं आवश्यक आहे. अर्ज कसा करावा : - GATE च्या अधिकृत वेबसाइटवर जा. - होमपेजवर रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करा. - आपले नाव, मोबाइल नंबर आणि वैध ईमेल आयडी वापरून लॉग इन करा. - अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरा. - आवश्यक कागदपत्रे अपलोड करा - आवश्यक शुल्काचे ऑनलाइन पेमेंट करा. - अर्जाची कॉपी डाउनलोड करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







