जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही घरबसल्या Freelancing जॉब्स करायचे आहेत? मग 'या' टॉप वेबसाईट्सवर आताच सुरु करा काम

तुम्हालाही घरबसल्या Freelancing जॉब्स करायचे आहेत? मग 'या' टॉप वेबसाईट्सवर आताच सुरु करा काम

8. जर तुमच्या घरात पश्चिम आणि नैऋत्य कोनांमध्ये अभ्यासाची खोली बनवणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ईशान्येलाही बांधू शकता.

8. जर तुमच्या घरात पश्चिम आणि नैऋत्य कोनांमध्ये अभ्यासाची खोली बनवणे शक्य नसेल, तर तुम्ही ती ईशान्येलाही बांधू शकता.

आज आम्ही तुम्हाला अशा काही वेबसाईट्स (Top Freelancing websites) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फ्रिलांसींगचं काम (How to do Freelancing Work) सुरु करू शकता.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 मार्च: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनानं संपूर्ण जगभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. काही नोकरी करणाऱ्या नागरिकांची नोकरीही (Latest Jos) गेली आहे तर काहींना वर्क फ्रॉम होम (Work from Home) करावं लागत आहे. मात्र हेच वर्क फ्रॉम लोकांना आवडू लागलं आहे. खास करून गृहिणींना वर्क फ्रॉम होममुळे (Work from Home for women) बराच फायदा झाला आहे. कुटुंबासह कामही होत असल्यामुळे गृहिणी खुश आहेत. मात्र आता सर्व ऑफिसेस पुन्हा सुरु (Offices reopen) होणार आहेत त्यामुळे काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम असणाऱ्या कंपनीत जॉब (Companies having work from Home) करू इच्छित आहेत तर काही फ्रिलांसींग (How to work freelancing) करू इच्छित आहेत. जर तुम्हाला फ्रिलांसींग (How to work as Freelancer) करून घरबसल्या कमवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही वेबसाईट्स (Top Freelancing websites) सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही फ्रिलांसींगचं काम (How to do Freelancing Work) सुरु करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. UPWORK Upwork ही वेबसाईट फ्रिलांसींगसाठी सर्वात विश्वासू वेबसाईट मानली जाते. तब्बल डिड लाखांच्या जवळपासून या वेबसाईट्सचे यूजर्स आहेत. यामध्ये तुमच्या फिल्डशी निगडित कोणतंही काम ततुम्हाला मिळू शकते. Upwork मध्ये प्रक्रिया खूप सोपी आहे, साइटवर स्वतःची नोंदणी करा, संबंधित श्रेणी आणि तुम्हाला ज्या प्रकल्पांवर काम करायचे आहे ते ब्राउझ करा आणि निर्देशानुसार बोली लावा. संरचित पेमेंट सिस्टम अतिशय सुरक्षित आहे, कारण Upwork क्लायंटकडून प्रगत पेमेंट घेते आणि ते एस्क्रो करते. एकदा प्रकल्प अटींनुसार आणि/किंवा सेट केलेल्या टप्पे आणि क्लायंटने मंजूर केल्यावर, ज्याला इतका वेळ लागत नाही, फी म्हणून दहा टक्के कपात केल्यानंतर पेमेंट लगेच तुमच्या खात्यात जमा केले जाते. जॉबची सुवर्णसंधी! रयत शिक्षण संस्थेत विविध पदांसाठी भरतीची घोषणा; थेट मुलाखत Toptal ही सुद्धा एक फ्रिलांसींग काम देणारी वेबसाईट आहे. या वेबसाईटद्वारे तुम्ही तुमच्या क्षेत्राशी निगडित कोणताही फ्रिलांसींग काम मिळवू शकता. यासाठी तुम्हाला आधी काम शोधून त्यानंतर त्या कामासाठी स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि बोली लावावी लागेल. तसंच जर तुम्हाला काम मिळालं तर तुम्हाला कल्याणात कडून भरघोस पैसे मिळू शकतील. सावधान! Resume मधील ‘या’ चुकांमुळे जाईल हातची नोकरी; आताच काही टिप्सचं करा पालन Freelancer जेव्हा तुम्ही नोकरी शोधायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मनात येणारे पहिले नाव म्हणजे फ्रीलांसर. कंपनीने फ्रीलांसरसाठी निर्माण केलेल्या संभाव्यतेच्या बाबतीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. कंपनी तुम्हाला त्यांचे कौशल्य सिद्ध करण्यासाठी इतर फ्रीलांसरशी स्पर्धा करण्याची परवानगी देते. तुमचा आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक असाल तर तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि अधिक काम मिळवण्यासाठी तुमची कौशल्ये, प्रतिभा किंवा क्षमता प्रदर्शित करू शकता. यामध्येही तुम्हाला नोकरीच्या आणि घाबरबसल्या काम करण्याच्या काही मोठ्या संधी मिळू शकतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात