मराठी बातम्या /बातम्या /करिअर /क्या बात है! कोरोनानंतर पुन्हा वाढताहेत जॉबच्या संधी आणि पगार; 'हे' टॉप क्षेत्रं जोमात

क्या बात है! कोरोनानंतर पुन्हा वाढताहेत जॉबच्या संधी आणि पगार; 'हे' टॉप क्षेत्रं जोमात

हे क्षेत्रं आहेत तरी कोणते? आणि काय आहेत या क्षेत्रांचे हाल? जाणून घेऊया.

हे क्षेत्रं आहेत तरी कोणते? आणि काय आहेत या क्षेत्रांचे हाल? जाणून घेऊया.

हे क्षेत्रं आहेत तरी कोणते? आणि काय आहेत या क्षेत्रांचे हाल? जाणून घेऊया.

मुंबई, 23 ऑगस्ट: गेल्या वर्षीपासून कोरोनानं (Corona) अक्षरशः थैमान घातलं आहे. अजूनही करूनच प्रादुर्भाव सुरूच आहे. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांची आर्थिक घडी नीट बसण्याचं नाव घेत नाहीये. परिणामतः देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे. मागच्या दीड वर्षांमध्ये अनेकांना आपले जॉब्स (Jobs) गमवावे लागले आहेत तर काही लोकांच्या पगारावरही परिणाम झाला आहे. मात्र अशातही असे काही क्षेत्रं आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये कधीच मंदी आली नाही किंवा हे क्षेत्रं आता सावरले आहेत. अशा क्षेत्रांमध्ये पुन्हा नवीन नोकरीच्या संधी (Latest Jobs) उपलब्ध होऊ लागल्या आहेत. तर कर्मचाऱ्यांचे पगारही वाढू लागले आहेत. मात्र हे क्षेत्रं आहेत तरी कोणते? आणि काय आहेत या क्षेत्रांचे हाल? जाणून घेऊया.

आर्थिक वर्ष 2020-21 च्या शेवटच्या तिमाहीमध्ये कंपन्यांचं आर्थिक उत्पन्न वाढू लागलं आहे असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) जारी केलेल्या एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात म्हंटलं आहे की चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीतही कंपन्यांच्या नफ्यात वाढ होताना दिसत आहे. RBI च्या अहवालानुसार 16 क्षेत्रांमध्ये कर्मचाऱ्यांच्या पगार (Salary) आणि भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे.

ही वाढ होण्याचं मुख्य कारण म्हणजे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं आहे  आणि पगारामध्ये वार्षिक वाढ केली आहे. वेतन बिलात (Ways Bill) सर्वाधिक वाढ कापड क्षेत्रात (Textile) (37.7 टक्के) आणि सर्वात कमी वाढ वाहतूक (Transport sector) (1.8 टक्के) क्षेत्रात दिसून आली आहे असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचा - कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी सोडला नाही अभ्यास; बुशरा बानो जिद्देने झाल्या IAS

या क्षेत्रांची भरारी

आयटी (IT), कम्युनिकेशन्स (Communications), पॉवर (Power), फार्मा (Pharma) आणि एफएमसीजी (FMCG) ही पाचक्षेत्रं आहेत ज्यांचं वेतन बिल आर्थिक वर्ष 2021 च्या सर्व तिमाहीत कधीच कमी झालं नाही. आयटी क्षेत्रातील वेतन बिल सर्व तिमाही दरम्यान वाढतच गेलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, त्यात 16.7 टक्के वाढ झाली. कोरोना महामारी दरम्यान, फार्मा क्षेत्रानंही चांगला नफा कमावला आहे.

कोणत्या क्षेत्रांना किती नफा

एफएमसीजी क्षेत्राचं वेतन बिल एप्रिल-जून तिमाहीत 10.6 टक्क्यांनी वाढलं. महामारीमुळे वीज क्षेत्रातील वापर कमी झाला पण आर्थिक वर्ष 2021 दरम्यान सर्व तिमाहीत वीज क्षेत्राचं वेतन बिल वाढताना दिसलं. त्याचप्रमाणे दळणवळण क्षेत्राचं वेतन बिल 7.4 टक्क्यांनी वाढलं.

या क्षेत्रांची वाढ मंदावली

RBI च्या अहवालानुसार, ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सर्वात कमी 1.8 टक्के वाढ झाली. तसंच कोरोना महामारीचा सर्वात वाईट परिणाम पर्यटन क्षेत्रावर झाला. गेल्या आर्थिक वर्षाच्या चार तिमाहीत या क्षेत्राच्या वेतन बिलामध्ये घट दिसून आली. मात्र या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत त्यात 4.3 टक्के वाढ झाली आहे. म्हणजेच हळुहलौ सर्वच क्षेत्रांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून येत आहे. तसंच नोकरी आणि पगारवाढही होताना दिसत आहे.

First published:
top videos

    Tags: Career opportunities, Corona, India, Jobs