जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Femina Miss India 2020: 'दिवसा घरकाम, रात्री कॉलसेंटर'; संघर्षाने रिक्षाचालकाच्या लेकीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब

Femina Miss India 2020: 'दिवसा घरकाम, रात्री कॉलसेंटर'; संघर्षाने रिक्षाचालकाच्या लेकीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब

Femina Miss India 2020: 'दिवसा घरकाम, रात्री कॉलसेंटर'; संघर्षाने रिक्षाचालकाच्या लेकीने पटकावला सौंदर्यवतीचा किताब

मिस इंडियाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपली स्वप्न कधी मरू दिली नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 फेब्रुवारी : तेलंगणाची सुंदरी मानसा वाराणसीने (Manasa Varanasi) फेमिना मिस इंडिया 2020 (Femina Miss India 2020) चा खिताब जिंकला आहे. या स्पर्धेचा ग्रँड फिनाले हयात रिजन्सी हॉटेलात झाला होता. उत्तर प्रदेशातील मान्या सिंह (Manya Singh) फर्स्ट रनर अप आणि मनिका शियोकांड (Manika Sheokand) सेकेंड रनर अप ठरली आहे. यादरम्यान मान्‍या सिंह सोशल मीडियावर ट्रेंड करीत आहे. मान्‍या दूसरे कंटेंस्‍टेंटहून खूप वेगळी आहे आणि त्यांचं जीवन संघर्षपूर्ण राहिलं आहे. (Femina Miss India 2020) मान्या सिंहने (Manya Singh) येथे पोहोचण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. मिस इंडियाच्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपली स्वप्न कधी मरू दिली नाही. त्यांनी सांगितलं की, मी अनेक दिवस न जेवता न झोपता काढली. मी रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी अनेक मैल चालून प्रवास केला. माझी मेहनत, हिम्मतीने मला साहसी केलं. ज्यातून मी माझी स्वप्न पूर्ण करू शकले. हे ही वाचा- ‘मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे दाखवून देईन’, प्रतीकनं आईसाठी केला ‘हा’ निश्चय लहान असताना काम करायला केली सुरुवात मान्या पुढे म्हणाली की, रिक्षा चालकाची मुलगी असल्याने शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. मी माझ्या टीनएजमध्ये असताना काम करण्यास सुरुवात केली होती. मला अभ्यास करायचा होता, मात्र ते माझ्या नशिबात नव्हतं, असंच वाटलं. शेवटी माझ्या वडिलांनी आईची दागिने गहाण ठेवले. त्यानंतर मी डिग्री मिळवली आणि परीक्षेची फी भरली. मान्याने 14 व्या वर्षी घर सोडलं होतं. यानंतर ती दिवसा अभ्यास करायची आणि रात्री भांडी घासण्याचं काम करीत. शिवाय रात्री कॉल सेंटरमध्ये काम करीत होती. तिने आपल्या यशामागे आई-वडील आणि भाऊ असल्याचे सांगितलं. ती म्हणाली क, मी आज Femina Miss India च्या स्टेजपर्यंत पोहोचू शकली हे केवळ माझे आई-वडील आणि भावामुळे. यांनी मला खूप पाठिंबा दिला आणि शिकवलं. जर तुमचा स्वत:वर विश्वास असले तर तुमची स्वप्न नक्की पूर्ण होतील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात