Home /News /career /

वर्क फ्रॉम होम, Cab सर्व्हिस, नाश्ता आणि इन्शुरन्स; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स; एकदा वाचाच

वर्क फ्रॉम होम, Cab सर्व्हिस, नाश्ता आणि इन्शुरन्स; ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या देताहेत 'या' ऑफर्स; एकदा वाचाच

कमर्चाऱ्यांनी (Employees want WFH) आता ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या नवनवीन ऑफर्स देत आहेत.

    मुंबई, 22  सप्टेंबर:  जगभरात कोरोनाचा (Corona) हाहाकार आता कमी होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आता आता कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये बोलवण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दीड वर्षांपासून वर्क फ्रॉम होम (Work from home end) करत असलेले कर्मचारी आता ऑफिसमध्ये परतण्यासाठी इच्छुक दिसत नाहीयेत. गेला बराच काळ कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता आला आहे. त्यामुळे आता ऑफिसध्ये जाण्यासाठी खर्च होणार वेळ, पैसे आणि शारीरिक कष्ट या सर्व गोष्टी लक्षात घेता कमर्चाऱ्यांनी (Employees want WFH) आता ऑफिसमध्ये परतण्यासाठी कंपन्या नवनवीन ऑफर्स देत आहेत. जगभरातील कंपन्या कर्मचाऱ्यांना भौतिक कार्यालयाच्या आवारात परत येण्यासाठी दबाव आणण्यासाठी ऑफर आणि प्रोत्साहन देऊन आमिष दाखवत आहेत. गोल्डमॅन सॅक्सने लंडन (London), न्यूयॉर्क (New York) आणि हाँगकाँगमधील कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत नाश्ता, दुपारचं जेवण आणि आइस्क्रीम देऊ केलं आहे, तर अॅमेझॉननं (Amazon) पुजेट साउंड आणि आर्लिंग्टन मुख्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी स्थानिक विक्रेत्यांकडून 100,000 कप कॉफी खरेदी केली आहे. हे वाचा - TCS Work from Home: काही कर्मचाऱ्यांना भविष्यात ऑफिस जाण्याची गरज पडणार नाही भारतात, विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS work from home end) आणि इन्फोसिस (Infosys) यासारख्या टॉप आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्या एकतर सुरू झाल्या आहेत किंवा टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बोलावण्याच्या प्रक्रियेत आहेत. LinkedIn  नं केलेल्या एकल सर्व्हेनुसार 35 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांनी कामाचा वाढता भार घरातून अनुभवला आहे, तसंच 34 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांना तणावाचा अनुभव आहे, म्हणूनच बहुसंख्य लोकांनी काम करण्याच्या हायब्रिड मॉडेलला पसंती दिली आहे. एका कंपनीचे CEO म्हणतात, मुलाखतीदरम्यान अनेक कर्मचारी विचारतात,"हे वर्क फ्रॉम होम आहे का?" कोरोना येतपर्यंत या प्रश्नाची कोणालाही सवय नव्हती.  जेव्हा मुलाखतीमध्ये या प्रश्नाचं उत्तर 'हो' असतं तेव्हा त्यांना सहजता येते आणि त्यांना हा जॉब करण्यासारखा वाटतो. पण जर 'नाही' असेल तर उमेदवार याबद्दल विचार करतात. हे वाचा - Central Railway Recruitment: मध्य रेल्वे मुंबई इथे 'या' पदांसाठी नोकरीची संधी काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना परत ऑफिसमध्ये परत बोलवण्यासाठी प्लॅन करत आहेत.  त्यासाठी कर्मचाऱ्यांचा ऑफिसमध्ये यायचा आणि जायचा खर्च कमी कसा करता येईल यावर विचार सुरु आहे.  HR यावर काम करत आहेत. त्यामुळे लवकरच कर्मचाऱ्यांना ऑफिसला यावं लागणार हे नक्की.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Jobs, TCS chairman, Work from home

    पुढील बातम्या