मुंबई, 12 डिसेंबर: Facebook ची पॅरेन्ट कंपनी Meta नं नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आता भारतातील तब्बल 1 कोटी लहान व्यवसायिकांना ट्रेनिंग (Meta training for small business) देणार आहे. तसंच तब्बल अडीच लाख Creators ना ट्रेनिंग (Creators training in India) देणार आहे. Facebook सह विदेशातील अनेक कंपन्या (Facebook Training in India) आता भारतातील कर्मचाऱ्यांवर विश्वास दाखवू लागल्या आहेत. तसंच भारतात आपला बिझिनेस करण्यासाठी तत्पर आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता Meta नं हा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचं वृत्त 'कनेक्ट गुजरात'या ऑनलाईन वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
Meta कंपनी लवकरच दिल्ली NCR मध्ये आशिया खंडातील आपलं सर्वात मोठं ऑफिस (Meta Office in New Delhi NCR) उभं करणार आहे. 1.3 लाख स्क्वेअर फूट जागेत असलेलं हे Meta चं आशियातील पहिलं स्वतंत्र ऑफिस असणार आहे. सेंटर फॉर फ्युलिंग इंडियाज न्यू इकॉनॉमी (CFINE) द्वारे लहान उद्योजक आणि निर्मात्यांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
"भारत हा फक्त फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp) आणि इंस्टाग्रामसाठी (Instagram) सर्वात मोठा देश नाही, तर अनेक मार्गांनी इंटरनेटच्या दुनियेत भविष्य घडवेल असा देश आहे. आम्ही हे ऑफिस तयार करून आमच्यासाठी एक अशी जागा तयार करण्याची संधी म्हणून पाहतो जिथे आम्ही फक्त ट्रेनिंगच नव्हे तर इतर देशांशी जोडण्याचा एक दुआ म्हणून बघतो." असं फेसबुक इंडियाचे (मेटा) उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन (Ajit Mohan) यांनी म्हंटलं आहे.
Microsoft Off Campus Drive: 'ही' पात्रता असणाऱ्या उमेदवारांना मिळणार नोकरी; वाचा
"CFINE, एक बहुकार्यात्मक केंद्र, कंपनीची सर्व उत्पादनं आणि प्रयत्नांना एकत्र आणेल, कंपनीचं तंत्रज्ञान आणि संसाधनं वापरून इनोव्हेटर्स आणि लहान व्यवसायांना आणि उद्योजकांना देशात भरभराट होण्यासाठी मदत करेल. तसंच त्यांचं भविष्य घडवेल" असंही ते म्हणाले.
तंत्रज्ञानाच्या शक्तींनी भारताला बदलून दिलेल्या अनोख्या संधीकडे जाण्याचं आमचं कर्तव्य आहे म्हणूनच पुढील तीन वर्षांत आम्ही केंद्राच्या माध्यमातून 1 कोटी लघु व्यवसाय आणि 2,50,000 निर्मात्यांना प्रशिक्षण आणि कौशल्य देण्याचा प्रयत्न करू. कोणतेही काम लहान नाही हे आम्ही ओळखतो म्हणूनच आम्ही हे पाउल उचललं आहे" असंही अजित मोहन यांनी म्हंटलं आहे.
सरकारने या वर्षाच्या सुरुवातीला नियम जाहीर केले ज्यात Twitter, Facebook, Instagram आणि WhatsApp सारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त due diligence घेणं आवश्यक आहे, ज्यामध्ये देशातील मुख्य अनुपालन अधिकारी, नोडल संपर्क व्यक्ती आणि निवासी तक्रार अधिकारी यांची नियुक्ती समाविष्ट आहे. त्यामुळे याच अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Facebook