मुंबई, 13 फेब्रुवारी: कोरोनामुळे या गेल्या शैक्षणिक वर्षातील बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th & 12th exam tips) रद्द करण्यात आल्यात. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. तसंच बारावीपर्यंत शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन (Offline exams of Maharashtra board 2022) पद्धतीनंच घेतल्या जातील असं राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तसंच परीक्षांचा टाइम टेबलही जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता बोर्डाच्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येण्यासाठी आतापासूनच विद्यार्थ्यांना सराव (Board Exam Preparation Tips) करावा लागणार आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला परीक्षेत कामी येणाऱ्या अशा काही टिप्स (Tips for Top the exam) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही Merit List मध्ये तुमचं नाव आणू शकता. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा (Practice test for board exams) सुरू होणार आहेत. बोर्डाच्या परीक्षांची उजळणी म्हणून या परीक्षा आवश्यक असतात. या परीक्षा नीट संपूर्ण आत्मविश्वासानं पेपर दिलेत तरच बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण (How to get good marks in board exams) मिळतात. त्यामुळे कोणतीही परीक्षा देताना नक्की कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे ज्यामुळे तुमचा पेपर चांगला जाईल हे जाणून घेऊया. प्रत्येक विषयाचं वेटेज समजून घ्या बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे विविध विषयांचे वेटेज समजून घेणे. कोणत्या विषयांवर जास्त भर द्यावा लागेल आणि आपण आपली तयारी कुठून सुरू करावी याची कल्पना यातून मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनो बोर्डाच्या परीक्षा जवळ येताहेत; ‘या’ चुका टाळा आणि करा तयारी चुकांकडे लक्ष द्या कोणताही अभ्यास करताना तुमहु कुठे कमी पडत असाल किंवा तुम्हाला काही चूक जाणवत असेल तर ती चूक लगेच दुरुस्त करा. वेळीच चूक दुरुस्त कराल तर तुम्हाला नंतरची चूक टाळण्यास मदत होईल. आत्मविश्वास ठेवा वारीं सर्व गोष्टी करताना स्वतःवर आणि तुम्ही केलेल्या अभ्यासावर विश्वास ठेवा. परीक्षेत तुम्ही वाचलेला प्रश्न न आल्यास घाबरून जाऊ नका. आत्मविश्वासानं अभ्यास करा आणि आत्मविश्वासानंच पेपर द्या. यश तुम्हालाच मिळणार. कॉन्सेप्ट्स स्पष्ट ठेवा विद्यार्थ्यांनी आपल्या कॉन्सेप्ट्स स्पष्ट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाचे सर्व कॉन्सेप्ट्स स्पष्ट असतील तरच तुम्ही MCQ प्रश्नांवर सहज मार्क्स मिळवू शकता. प्रत्येक गोष्टीबाबत अपडेट राहा आणि जिथे तुम्ही कमकुवत आहात त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. फॉर्मुला Tricks वापरून पाठ करा गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा अर्थशास्त्र विषयांच्या परीक्षेसाठी विविध महत्त्वाच्या फोर्मुलांसाठी काही tricks तुमच्याकडे ठेवा. त्यामुळे परीक्षा सहज सोडवण्यास मदत होईल. यामध्ये माईंड मॅपिंग तुम्हाला मदत करू शकेल. Golden chance: ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी इंडियन कोस्ट गार्डमध्ये मोठी पदभरती सराव करत राहा तुमची तयारी पूर्ण झाल्यावर, त्याचा कसून सराव करा. सराव सत्रांच्या मदतीने परीक्षेचा पॅटर्न समजण्यास खूप मदत होते. तसंच नवनवीन प्रश्न सोडवून बघितल्यामुळे तुमच्या ज्ञानातही भर पडते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.