मुंबई, 09 मार्च: जग पुढे जात असताना टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातही (Technology Field) प्रचंड प्रगती होत चालली आहे. मानवी यंत्रांपेक्षा आर्टिफिशिअल आणि रोबोटिक्स (Robotics) तसंच ऑटोमेशनला (Career in Automation) मागणी वाढत चालली आहे. म्हणूनच या क्षेत्रातील प्रोफेशनल्सची (Jobs for professionals) गरजही भासू लागली आहे. टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नोकऱ्या (Jobs in Technological sector) भरपूर आहेत मात्र उच्चशिक्षण आणि स्किल्स असणारे फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्स कमी आहेत. जर तुम्हाला टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये (Best career options in Technological sector) करिअर करायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे.आज आम्ही तुमहाला टेक्नॉलॉजी क्षेत्रातील असे काही कोर्सेस (Top Technology courses) आणि करिअर ऑप्शन्स सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता आणि भरघोस पगाराची नोकरीही मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Career in AI) हे संगणक विज्ञानाचे क्षेत्र आहे. यामध्ये माणसाप्रमाणे काम करणारी यंत्रे तयार करावी लागतात. ही बुद्धीमान यंत्रे नियोजन, उच्चार ओळखणे, शिकणे आणि समस्या सोडवणे या कामांमध्ये चांगली कामगिरी करतात. सिरी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे (Courses in Artificial intelligence) उत्तम उदाहरण आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करिअर करायचे असेल तर फिजिक्स आणि बायोलॉजीप्रमाणे गणित, मानसशास्त्र आणि विज्ञानाचा अभ्यास करावा. याशिवाय काही बेसिक प्रोग्रामिंग भाषा शिकणे देखील फायदेशीर ठरेल. IT क्षेत्रातील महिलांना मानवलं WFH; नोकरी सोडणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी घट सायबर सिक्युरिटी (Cyber Security) वाढत्या तंत्रज्ञानाने आपल्या जीवनात क्रांती घडवून आणली असतानाच त्याचे काही धोकेही समोर आले आहेत. अलीकडच्या काळात, संगणक हॅक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, म्हणजेच तुमच्या सिस्टमची माहिती इतर कोणाकडे आहे. यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीला धोका तर आहेच, पण देशालाही धोका आहे. म्हणूनच आजच्या काळात सरकार आणि संस्था सायबर सुरक्षा अतिशय गांभीर्याने घेत आहेत आणि या क्षेत्रातील व्यावसायिकांना खूप मागणी आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सायबर सिक्युरिटी आणि फॉरेन्सिक्समध्ये स्पेशलायझेशनसह, बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंगचीही खूप मदत होईल. येथे तुम्ही माहिती सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा प्रशासक, सॉफ्टवेअर डेव्हलपर, सायबर पॉलिसी विश्लेषक इत्यादींच्या जॉब प्रोफाइलवर काम करू शकता. परीक्षेच्या आधी Mock Test ठरू शकतात वरदान; चांगले मार्क्स मिळवण्यात होईल मदत क्लाउड कॉम्प्युटिंग (Cloud Computing) क्लाउड कॉम्प्युटिंग हे एक तंत्रज्ञान आहे जे आम्हाला इंटरनेटवर आभासी संसाधने उपलब्ध करून देते. सध्या, हे ऑप मागणी करिअर पर्यायांपैकी एक आहे. संगणक शास्त्र, अभियांत्रिकी इत्यादी विषयात पदवी घेतलेले विद्यार्थी या क्षेत्रात सहज करिअर करू शकतात. येथे तुम्ही सॉफ्टवेअर आर्किटेक्ट, आयटी आर्किटेक्ट, टेक्निकल कन्सल्टंट, क्लाउड सॉफ्टवेअर इंजिनीअर इत्यादी नोकऱ्या करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.