नवी दिल्ली, 12 जानेवारी : गेल्या काही वर्षांत विविध क्षेत्रांतील करिअरमध्ये (Career Scope) खूप बदल झालेत. आजकाल प्रॉडक्ट मॅनेजरला (Product Manager Job) खूप मागणी आहे. हे मॅनेजर त्यांची योग्यता (Eligibility for Product management posts) आणि स्किल्सच्या (skills for Success) बळावर कंपनीचे कोणतेही उत्पादन योग्य बाजारात (Product Manager Job Description) विकण्यास कंपनीला मदत करतात. एखादे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पूर्णपणे या मॅनेजरवर असते. अर्थात प्रॉडक्ट मॅनेजर बनणे सोपे नाही. त्यासाठी संबंधित क्षेत्रात तुम्हाला एमबीए (MBA Course) करावे लागेल, आणि त्यानंतरही तुम्हाला तुमच्या विशेष कौशल्यांवर काम करावे लागते. प्रॉडक्ट मॅनेजर झाल्यानंतरही करिअरमध्ये सातत्यपूर्ण प्रगती (Career Growth) होण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. यशस्वी मॅनेजरमध्ये उत्पादनांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच पर्सनल स्किल्स असणे देखील आवश्यक मानले जाते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. एखाद्या क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवेश केल्यानंतर, त्यामध्ये टिकून राहण्यासाठी आणि आपला ठसा उमटवण्यासाठी स्वतःचे स्किल्स सतत अपग्रेड करणे आवश्यक आहे. प्रॉडक्ट मॅनेजरच्या बाबतीत सुद्धा हे लागू होत असून या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणकोणती स्किल्स आवश्यक आहेत, ते जाणून घेऊयात. Exam Tips: कोणतीही परीक्षा देण्याआधी का सोडवावेत सॅम्पल पेपर्स? वाचा फायदे 1. रिसर्च स्किल्स (Research Skills) यशस्वी प्रॉडक्ट मॅनेजर होण्यासाठी, तुमच्याकडे संशोधन करण्याची क्षमता असली पाहिजे. तुमच्या ग्राहकांना तुमच्याकडून काय हवे आहे, आणि तुम्ही ते कसे पोहोचू शकता, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. 2.अॅनालिटिकल स्किल्स (Analytical Skills) मार्केटिंगशी संबंधित संशोधन केल्यानंतर, उत्पादनाशी संबंधित निर्णय केव्हा आणि कसे घ्यायचे हे प्रॉडक्ट मॅनेजरला ठरवावे लागते. यासाठी मार्केटिंग संशोधनाच्या डेटाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे. 3. डेलिगेशन स्किल्स (Delegation Skills) प्रत्येक प्रॉडक्ट मॅनेजरला हे माहित असले पाहिजे की त्याच्या टीममध्ये कोणते काम कोण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकते. त्यानुसारच टीम मधील सदस्यांना आवश्यक जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत. Resume Tips: आधी शिक्षण की आधी अनुभव? सुरुवातीला नक्की काय लिहावं? जाणून घ्या 4. कम्युनिकेशन स्किल्स (Communication Skills) प्रॉडक्ट मॅनेजर म्हणून तुम्हाला प्रेझेंटेशन बनवावे लागते आणि ते ग्राहकांसमोर सादर करावे लागते. यासाठी तुम्हाला लोकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने तुमचे म्हणणे त्यांच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे असते. तुम्हाला जर या क्षेत्रात काम करायचे असेल, किंवा तुम्ही या क्षेत्रात काम करीत असाल तर वेळोवेळी तुमच्यामधील स्किल्स अपडेट करणे हे तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.